पान:जपानचा इतिहास.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २१ वें.

११५


ठिकाणीं विश्रांति घेत असत. देवळांत पक्षी अशासाठी बाळगावयाचे कीं, सकाळ झाल्याबरोबर किलकिलाट करून त्यांनी देवास जागें करावें.

 देवळामध्ये दोन खोल्या असतात. शिंटो धर्मांत मूर्ति-पूजन हाणून ज्याला आपण झणतों तें नाहीं. ज्या मनु- याची पूजा करावयाची त्याच्या नांवाने कोणताही एखादा जिन्नस घेऊन फक्त त्या जिनसाची पूजा करितात. तें पूज्य मनुष्य स्त्री असेल तर आरशाची व पुरुष असेल तर तरवारीची पूजेचे ठिकाणीं योजना केलेली असते. कधीं कधीं एकादा चमत्कारिकसा खडा किंवा कधीं जोडा सुद्धां पूज्यस्थानी जाऊन बसतो. तो जिन्नस एका पेटींत घालतात, ती पेटी दुसऱ्या पेटीत घालतात व त्यावरून पुष्कळशी रेशमी फडकी गुंडाळतात. आंतल्या खोलींत फक्त देवाच्या पुजायाला कांहीं विवक्षित प्रसंगीच जातां येतें. इतर प्रसंगी त्याला सुद्धां आंत जाण्याची बंदी आहे, मग इतर लोकांना कोठून मोकळीक असणार? एके प्रसंगी एका प्रख्यात मुत् शिंटो देवळापुढचा पडदा आपल्या हातांतील काठीनें आंत काय आहे तें पाहण्याकरितां बाजूला सारला, तर तेवढ्या- वरून एका धर्मवेड्यानें त्या थोर पुरुषाचा खून केला.

 बाहेरच्या खोलीत एक लांब व पातळ कांठों रोवलेली असते. तिच्यावर लांब लांब पांढरे कागद फटकावत सोड- लेले असतात. पूर्व काळीं देवाला अर्पण केलेली चिरगुढें झाडाला बांधण्याची चाल होती; तिचेच निदर्शक हे काठीला चिकटविलेले कागद होत. ह्या काठ्यांना देवांचें निवास- स्थान समजतात.