पान:जपानचा इतिहास.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
जपानचा इतिहास.

होत्या तें चांगलें कळून येतें. मिकाडो हा सूर्याचा वंशज. त्याला मान देऊन आपल्या कर्तव्यकर्माची सीमा झाली असें प्रत्येक जपानी समजत असे.

 सूर्य हा त्यांचा मुख्य देव. त्याशिवाय वाकीही पुष्कळ देव आहेत. ते येणेंप्रमाणेः वायु, अग्नि, अन्नपूर्णा, मरी- आई, वगैरे वगैरे. राजाचे पूर्वज, कवी, विद्वान्, योद्धे, मुत्सद्दी व कित्येक स्वदेशाभिमानीही देव होऊन बसले आहेत. कोणाही थोर मृत मनुष्याला देव बनविण्याचा अधिकार मिकाडोला आहे. तो सांगेल त्या लोकांस देव मानून त्यांची पूजा करावी लागते. प्रत्येक गांवचा असा ह्मणून एक देव ठरलेला असतो. तो देव त्या गांवचें संरक्षण करितो अशी त्या लोकांची समजूत आहे. गांवच्या कोणाही मनुष्याला मूल झालें ह्मणजे तो तें आपलें मूल त्या देवाच्या पायाव आणून घालतो.

 आईस प्रांतामध्यें एक अन्नपूर्णेचें व एक सूर्याचें अशीं दोन देवालये आहेत. ती फार पवित्र मानलीं आहेत. तीं दोन्ही एकमेकांजवळजवळ आहेत; व ' मोठे दोन देवांच वांडे ' अशा नांवानें तीं प्रख्यात आहेत.

 शिंटो देवळे थेट पूर्व काळच्या जपानी देवळासारखी असतात. तीं उत्तम लांकडाची बांधलेली असून त्यांच्यावर कौलें किंवा झाडांच्या सालीं यांचे छप्पर असतें. त्या देवळांत डामडौल, नक्षी वगैरे कांहीं दिसून यावयाचें नाहीं. सर्व काम साधें. देवळाच्या आवारांत प्रवेश करतेवेळीं एक मोठी थोरली चौकोनी कमान लागते. हीस ' पक्षिनिवास ' असें ह्मणतात. कारण कीं देवळांत बाळगलेले पक्षी पूर्वी ह्या