पान:जपानचा इतिहास.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जपानचा इतिहास.

समुद्रकांठाला आलें असतां समुद्राची खोली आस्ते आस्ते वाढत न येतां एकाएकीं आंत गेलेली असते. सर्व समुद्र- किनारा याप्रमाणेंच अगदीं खोल आहे. मधून मधून कोठ कोठें मात्र सपाट वाळवंटे आहेत. होंडो, कियुशियु वगैरे जपानी बेटांनी सभोवार वेढल्यामुळे मर्यादित झालेला जो पासिफिक महासागराचा भाग, त्यास अंतःसमुद्र ऊर्फ जपानी समुद्र असें ह्मणतात. चीनच्या पूर्वेस फोर्मोसा नांवाचें एक बेट आहे. त्या बेटापासून पासिफिक महासागरांतून एक पाण्याचा प्रवाह निवून तो थेट ईशान्य दिशेला जपानच्या किनाऱ्याला थडकून जातो. त्या प्रवाहाचें पाणी आजू- 'बाजूच्या समुद्राच्या पाण्यापेक्षां विशेष कोमट असतें, ह्यास कृष्णप्रवाह' अशी संज्ञा दिलेली आहे.

 जपान देश बहुतेक डोंगराळच आहे. होंडो बेटामध्यें भली जंगी एक पर्वतांची रांग आहे. त्या पर्वतांची शिखरें सामान्यत्वें ८ हजारापासून ९ हजार फूटांपर्यंत उंच आहेत. टोकियो शहराजवळ ' फूजियामा ' या नांवाचा एक विझून निवालेला ज्वालामुखी पर्वत आहे. त्याची उंची १२ हजार फूट आहे. इतर ज्वालामुखींप्रमाणेंच त्याचा आकार शंकूच्या सारखा असल्यामुळे तो मोठा सुंदर दिसतो. त्या पर्वताचें शिखर बहुतकरून सर्वकाळ वर्फानें आच्छादिलेलें असतें, टोकियो येथून पाहिलें असतां प्रभातसमयीं त्याचा वर्ण गुलाबी दिसतो. पुढें सर्व दिवसभर त्याचा वर्ण डोळे दिपविण्याइतका पांढरा असतो किंवा धुक्याच्या योगानें तो दिसत नाहींसा तरी होतो. सायंकाळी सूर्यास्ताचे समयीं तो 'जांभळा दिसतो, जपानी लोक ह्या पर्वताला ' अप्रतिम ' पर्वत