पान:जपानचा इतिहास.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण २१ वॅ. दगडी कोळसा पुष्कळसा चिनांत खलास होतो. लाखीकाम वगैरे कारागिरीच्या जिनसाच परकीयांनी एके वर्षों ३७ लाख रुपयाच्या जपानांत खरेदी केल्या. त्या योगानें जपानांतील पुष्कळ कारागिरांना अलीकडे भरपूर वेतन मिळू लागले आहे. प्रकरण २१ वें. ००५०५०० जपानांतील धर्म. जपानी लोक आपल्या जुन्या धर्मपंथाला 'देवमार्ग' असें ह्मणतात. त्याला चिनी भाषेमध्ये शिंटो असा प्रतिशब्द आहे ह्मणून इंग्रज वगैरे परस्थ लोकांनी त्या धर्माला 'शिंटो धर्म ' असे नांव ठेविलें आहे. हा धर्म जपानांत फार प्राचीन- . काळापासून चालत आला आहे. 6 कांहीं सृष्टपदार्थपूजा च कांहीं पितृपूजा अशी त्या धर्मांत सरभेसळ आहे. त्या धर्माचें निराळे असे पुस्तक नाहीं. त्या धर्माचीच अशीं कांहीं मतेही नाहीत किंवा कांहीं नीतीही नाहीं. ह्या धर्माचे पुनरुज्जीवन अलीकडे एका मोटूरी नां- वाच्या जपान्यानें केले आहे. तो ह्मणतो, 'नीतिशास्त्र हें चिनी लोकांनी बळेच उपस्थित केलेले एक शास्त्र आहे. कारण कीं, त्यांच्या स्वतःमध्यें नीतिमत्ता नाही. परंतु आह्मां जपान्यांना नीतिशास्त्राची कांही गरज नाहीं. कारण कीं, प्रत्येक जपानी जर आपल्या अंतःकरणाला स्मरून वागेल तर त्याच्या हातून वाईट गोष्ट कधींही व्हावयाची नाहीं. " पूर्वी कोजिकी नांवाचा जो ग्रंथ सांगितला त्या ग्रंथावरून प्राचीनकाळी जपानी लोकांच्या धर्मसंबंधानें काय समजुती