पान:जपानचा इतिहास.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २० वै.

१११


 आरमारांत सुमारे ३०/४० जहाजें आहेत. त्यांपैकीं एक येवढे मोठें आहे कीं, त्यांत १० हजार लोकांचा समा- वेश सहज होऊं शकतो. तें लोखंडानें मढविलेले आहे.

_______
प्रकरण २० वें.
________
जपानांत व्यापार कसा चालला आहे ?

 टोकुगारा शोगुनच्या कारकिर्दीत व्यापाराला फार धक्का बसला हें पूर्वीच सांगितलें आहे. किनान्या किनाऱ्या लगत फिरणारी तेवढीं जहाजें तयार करण्याची सरकारची परवानगी होती. मोठी जहाजें तयार करण्यास कायद्यानें बंदी होती. परदेशांत जाण्याचें जो कोणी पातक करील, तो हातीं लाग- ल्याबरोबर त्यास देहांत प्रायःश्चित्त देण्याची चाल पडली होती. डच लोकांशिवाय इतर कोणालाही जपानांत येण्याची मोकळीक नव्हती. डच लोकांनाही व्यापाराची असावी तशी मोकळीक नव्हती. परवानगीपेक्षां जास्ती मालसुद्धां त्यांना जपानांत आणितां येत नसे.

 जपानदेश सर्व लोकांना खुला झाल्याबरोबर परदेशांत आपल्या कांहीं चिजा विकावयास सांपडतील व परदेशांतील कांहीं चिजा आपल्या उपयोगी पडतील ही गोष्ट जपानी लोक लवकरच उमजले. त्यामुळे परदेशांशीं व्यापार लवकरच जारीचा सुरू झाला, व उभयपक्षी फायदा होऊं लागला. गेल्या दहा पंधरा वर्षांत जपानचा परदेशाशीं व्यापार दुपटी- पेक्षां अधिक वाढला आहे.