पान:जपानचा इतिहास.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
जपानचा इतिहास.

 लष्करांत दोन वर्ग आहेत. एक राखून ठेवलेलें लष्कर व दुसरें कामावर असलेलें लष्कर. ह्या दुसऱ्या लष्करांत जे लोक असतात ते बहुधा वीस वर्षांच्या वयाचे अदमासाचे अस- तात. त्यांची नोकरीची मुदत तीन वर्षांची असते. त्यानंतर त्यांचें नांव राखून ठेवलेल्या लष्कराच्या पटांत दाखल करितात. त्या ठेवलेल्या लष्करांत असतांना त्यांना घरीं राहण्याची परवानगी असते. परंतु पांच वर्षेपर्यंत त्यांना घराहून वरचेवर कवाइती - करितां बोलावतात त्या वेळी त्यांना जावें लागतें. तदनंतर ज्याची इच्छा लष्करांत जावयाची नसेल, त्याने घरीं राहून खुशाल मनास वाटतील ते अन्य व्यवसाय करावे. लढाईच्या वगैरे ऐन आणीबाणीच्या प्रसंगी मात्र त्यांनी हजर व्हावें. कामावर असलेल्या जपानी लष्करांत सुमारे ८० हजार लोक असतात व राखून ठेवलेल्यांत ९६ हजार असतात. त्यांची शस्त्रे व पोषाक युरोपीय असतात.

 शोगुनची सत्ता लयाला जाण्यापूर्वी त्यानें ब्रिटिश सर- कारची मदत घेऊन आरमारें बांधण्यास आरंभ केला होता. परंतु राज्यक्रांति झाली त्यावेळी त्या ब्रिटिश लोकांना तेथून पळ काढावा लागला. पुढें मिकाडोची सत्ता पूर्णपणे यथा- स्थित झाल्यानंतर १८७१ साली आपल्या लोकांस आपलें आरमार चालविण्यास तयार करण्यासाठीं ' नेव्हल कॉलेज ' स्थापण्याकरितां त्यानें ब्रिटिश सरकाराकडून ३० आफिसर मागविले. त्यांनी सहा वर्षेपर्यंत जपानांत राहून त्या लोकांना दर्यावर्दीच्या कामांत शिक्षण दिलें. नंतर ते निवून गेले. अद्यापपवितों जपानी आरमारावर एक दोन इंग्रेज अम्मलदार जपानी सरकार मुद्दाम ठेवित असतें.