पान:जपानचा इतिहास.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १९ वें.

१०९

जपानांतील लष्कर व आरमार

 फार प्राचीन काळापासून पुष्कळ शतकेंपर्यंत ज्याप्रमाणें आमच्या हिंदुस्थानांत त्याप्रमाणे जपानांत शिपाई लोकांचा वर्ग निराळा होता. युद्धाच्या वगैरे काळांत ह्या शिपायांची मान्यता मोठी असे. ह्या शिपायांना सभ्य गृहस्थ असें ह्मणत असत.

 प्राचीनकाळी जपानी लोक आंगांत जे चिलखत घालीत, तें बहुधा जाड कापडाचें किंवा कातड्याचेंच असे. आठव्या शतकामध्ये धातूंच्या चिलखतांचा सर्व सामान्य उपयोग होऊं लागला. तें चिलखत बहुधा लोखंडाच्या, पोलादाच्या किंवा पितळेच्या सळ्यांचें अगर साखळ्यांचें असे. होता होईल तों प्रत्येक अवयव त्या चिलखतानें झांकावे अशा रीतीनें तें बनविल्यामुळें फार जड होई. जपानी लोक धनुष्यबाण, व भाला व तरवार हींच हत्यारें पूर्वी वापरीत असत.

 १८६८ साली झालेल्या राज्यक्रांतीनंतर सरकारानें फ्रान्स देशांतले व जर्मनी देशांतले लष्करी कामगार आपा- पश्या कामांत पटाईत असे बोलावून आणले व त्यांच्या सल्यानें लष्कराची नवी रचना केली. पुष्कळ युरोपीय देशांत ज्याप्रमाणे त्याप्रमाणे जपानांतही प्रत्येक धट्याकट्या मनु- ष्याला कांहीं दिवस लष्करांत अवश्य नोकरी करावी लागते. दोनशे सत्तर डॉलर दंड सरकारांत अगोदर भरला, ह्मणजे मात्र हैं लष्करी नोकरीचें लचांड सुटतें. मुलगा आईबापांचा जर एकुलता एक असेल तर त्याला लष्करांत जावें लागत नाहीं. ज्या मुलाच्या मनांतून लष्करांतील चाकरी टाळा- वयाची असेल तो निपुत्रिकाच्या ओट्यांत जातो.
५०