पान:जपानचा इतिहास.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
जपानचा इतिहास.

त्याचा शिक्का मारून घेतात. खटल्याच्या वेळची सवं चौ. कशी टिपून घेतात.

 हिंदुस्थानाप्रमाणें जपानांतही वकीलांचा ऊत येऊं पहात आहे. कोणताही मुलगा शिकूं लागला ह्मणजे आधीं वकील होईन ह्मणतो. सरकारचें एक कायद्याचे कॉलेज आहे. शिवाय इतर आणखी आठ कायद्याचीं कॉलेजें खासगी आहेत. त्यांतून सुमारें एक हजार तरुण लोक वर्षास तयार होऊन निघतात.

 वर्तमानपत्रावर करडी नजर - पूर्वीच्या अमदानीत वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य नसे. पाश्चिमात्य शिक्षणाबरोबरच वर्तमानपत्रांना स्वतंत्रता देण्याची कल्पना जपानी लोक शिकले. आतां वर्तमानपत्रांना लिहिण्याची बरीच स्वतंत्रता मिळाली आहे. परंतु अजूनही “ एकाद्या वर्तमानपत्रांत नीतीच्या विरुद्ध किंवा सार्वजनिक स्वास्थ्याला धोका येण्या- सारखे लेख आले आहेत, असें मुख्य दिवाणास वाटल्यास त्यास तें वर्तमानपत्र कांहीं दिवसपर्यंत किंवा अजीबात बंद करण्याचा अधिकार आहे. "

 नवीन राज्यपद्धति चालू करण्याविषयींचा १८८९ साली जेव्हां जाहीरनामा लागला तेव्हां त्रेचाळीस वर्तमानपत्रे बंद करण्यांत आली. त्यांचे बंदीचे दिवस सातापासून एक- व्वदपर्यंत होते. अशा रीतीने ज्यांना शिक्षा झाली, त्यापैकीं कित्येक वर्तनाने पुन्हां कधीं निघू लागलीं नाहींत; अशी वर्तमानपत्रांत अगर इतरत्र छापून गुन्हा ठरल्यामुळे शिक्षा झालेली उदाहरणें बरीच आहेत. १८९० साली एका एडीटराला ४॥ वर्षांची शिक्षा देण्यांत आली.

_______