पान:जपानचा इतिहास.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १८ वें.

१०७


जपानांतील कायदा कोणच्या धर्तीवर आहे ?

 जपानांतील जुना कायदा थेट चिनी कायद्याच्या धर्तीवर होता. अपराध्यानें आपला गुन्हा कबूल केल्यावांचून त्याला शिक्षा करतां येत नसे. ह्मणून त्याने असलेला नसलेला अपराध कबूल करावा यासाठीं अधिकारी लोक त्याचा छळ करीत असत. त्यामुळे निरपराधी मनुष्यालाही फार ताप सोसावा लागे.

 ह्या असल्या प्रकारची अम्मलबजावणी आपणावर करून घेण्यास परदेशी लोक कांकूं करूं लागले. त्यांचें झणणें असें पडलें कीं, तुझी आमच्या खटल्यांचे निकाल आमच्या देशांतील कायद्याअन्वये करीत चला. ह्या कारणामुळें व दुसऱ्या कित्येक कारणांमुळे जपानी सरकारचें कायदे सुधा- रण्याकडे बरें लक्ष लागलें. क्रिमिनल कोड व क्रिमिनल प्रोसीजर कोड, हीं दोन्हीं एका फ्रेंच मनुष्याने कोड नेपोलि- यनच्या धर्तीवर लिहिली. हीं दोन्हीं १८८२ साली अम- ठांत आली. सिव्हिलकोड व सिव्हिल प्रोसीजर कोड, त्याच • प्रमार्णे कमर्शियल कोड, ह्रीं नन्तर तयार करण्यांत आली.

 फार हाल करण्याच्या शिक्षा व हरकिरीची शिक्षा आतां बन्द झाली आहे. फांशीची शिक्षा आतां फारच थोड्या प्रकारच्या गुन्ह्यांना आहे. न्यायपद्धतीमध्यें इंग्लिश लोकां- 'पेक्षां फ्रेंच व जर्मन लोकांचें अनुकरण विशेष आहे. सर्व चौकशीचा मक्ता एक जज्जाकडे असतो. वकीलाला कांहीं प्रश्न विचारावयाचे झाल्यास ते त्याने जज्जामार्फतच विचा- रले पाहिजेत. साक्षीदाराची जबानी लिहून घेऊन त्याखाली