पान:जपानचा इतिहास.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
जपानचा इतिहास.

बरखास्त करून टाकली. लोकमताची चांचणी पाहण्या- करितां नवी निवडणूक सुरू झाली. निवडणुकीच्या कित्येक ठिकाणी मोठमोठे दंगे झाले. स्वराज्याचा उपयोग जपानी लोक कसा काय करून घेताहेत हे त्यांच्या आलीकडच्या कीर्तीवरून सर्वांस महशूर झालेच आहे. प्राच्य राष्ट्रांत लोकसत्ताक राज्यपद्धतीचें बीज रुजावयाचें नाहीं, अशी ज्या लोकांची आजपर्यंत समजूत होती, त्यांनीं हें जपानच्या अभ्युदयाचें प्रत्यक्ष उदाहरण पाहिल्यानंतर आतां त्यांची ती पूर्वीची समजूत बरीच नष्ट झाली असली पाहिजे, असें ह्मणण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. योग्य तऱ्हेचें शिक्षण मिळाल्यास कोणच्याही - प्राच्य व पाश्चात्य - राष्ट्रास आपला कारभार चांगल्या रीतीनें पाहतां येतो. हिंदुस्थानांत शांतता स्थापन होऊन व पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार होऊ लागल्यापासून, जपानला जेव्हांपासून पाश्चात्य शिक्षण मिळू लागलें, त्यापे क्षांही अधिक काळ लोटला आहे. पण दिवसानुदिवस आम- चा पाय खोलांत जात चाळल्याची चिन्हें दिसूं लागलीं आहेत. एक फक्त योग्य तऱ्हेच्या शिक्षणाचा अभाव हेंच ह्या स्थितीचें प्रधान कारण होय. असो.

 जपानांतील पार्लमेंटांतील मुखत्यारांच्या सर्भेत सामान्य जनांचीं मतें प्रदर्शित होतात व वरिष्ठ समेत बड्या लो- कांचीं मतें प्रदर्शित होतात. वरिष्ठ सभेतील लोक मुख- त्यारांच्या सभेंतील लोकांपेक्षां विशेष शिकलेले व विशेष अनुभवाचे असल्यामुळे, गडबडीने व अविचाराने खालच्या सभेनें एकदा कायदा पास केल्यास तोही वरिष्ठसभा बहुतेक रद्द करिते, त्यामुळे राष्ट्राचें बरेंच हित होतें.

_______