पान:जपानचा इतिहास.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वै.

१०५


रुपये. ह्या सभेनें निवडलेल्या व बादशहाने निवडणूक पसंत केलेल्या पहिल्या अध्यक्षाचें नांव मि. निकाजिम असें होतें. 'तो लिबरल पक्षाचा असून ख्रिस्ती झालेला होता.

 कोणाच्याही गोष्टीबद्दल राजा, मंत्रीलोकांना जबाबदार धरितो. जमाखर्चाचं बजेट पार्लमेंट सभेपुढे दरसाल सादर करण्यांत येते. परंतु त्यांतील नेमलेल्या खर्चात कमी कर- ण्याचा त्या सभेला अधिकार नाहीं. त्याचप्रमाणें राज्याची जी खासगी तैनात ठरलेली आहे, तींत कमी करण्याचाही अधि- कार तीस नाहीं. जास्ती मागितल्यास मात्र देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे.

 जपानी लोकांना स्वराज्याचा ह्मणजे आपलें आपणच राज्य चालविण्याचा अनुभव आजपर्यंत नव्हता. ही गोष्ट लक्षांत आणली ह्मणजे जपानी पार्लमेंटाची जी पहिली बैठक झाली, ती बरीच समाधानकारक झाली असें ह्मणावें लागतें. त्या पार्लमेंटचें लक्ष खर्चाची काटकसर करण्याकडे विशेष होतें. मुखत्यारांच्या सभेची दुसरी जी बैठक झाली, त्यावेळीं तिचा बहुतेक कल असा होता कीं, मंत्री मंडळाने आणलेली सूचना-मग ती चांगली असो किंवा वाईट असो- ती हाणून पाडावयाचीच. धरणीकंपामुळे उघड्या पडलेल्या मनुष्यांना मदत करण्याकरितां जी रक्कम खर्च करण्यांत येत असे, ती सुद्धां ह्या बैठकीत बरीच कमी करण्यांत आली. मुख्य उद्देश काय की, सत्ता आपल्या पक्षाच्या हातीं यावी. पुढें मंत्री- मंडळाला लवकरच राजीनामा द्यावा लागला. 'शासन- पद्धतीच्या' सातव्या आक्टाप्रमाणे १८९१ च्या दिसेंबर महिन्यांत २९ व्या तारखेस बादशहानें मुखत्यारांची सभा