पान:जपानचा इतिहास.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
जपानचा इतिहास.

३१ असतात. बाकीचे एकशें पांच, निरनिराळ्या दर्जाच्या सरदारांनी आपापल्या दर्जातलेच निवडून दिलेले असतात. राहिलेले तीन अन्य तऱ्हेनें निवडलेले असतात. शिवाय सरकारनें आपल्या पसंतीने नेमलेले असे ५९ असतात. ज्यांनी आपल्या चाकरीनें सरकारला खुष केलें आहे, अगर जे मोठे विद्वान् आहेत, अशांना बहुतेक सरकार ह्या जागा देतें. शिवाय श्रीमान् लोकांनाही त्या समेत आपले मुखत्यार पाठविण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मुखत्यारांची संख्या ४४ असते. जे मोठमोठाले १५ प्रकारचे कर सरकारला भरीत असतील, त्यांना ह्या सर्भेत निवडून येण्याचा व देण्याचा अधिकार आहे. हे लोक बहुधा जमीनदारांपैकी असतात. येणेंप्रमाणे ह्या वरिष्ट सर्भेत चार वर्गाचे सभासद असतात. पहिले राजघराण्यांपैकी १०:२, सरदारांपैकी १३९:३ सरकारने नेमलेले ५९:४ श्रीमान् लोकांनी निवडलेले ४४ मिळून एकंदर सभासदांची संख्या २५२ असते. ह्या सभेची मुदत सात वर्षांची असते. सात वर्षांनंतर पुन्हां दुसरी निवडणूक व्हावी लागते. पहिल्याप्रथम भरलेल्या वरिष्ठ सभेचा अध्यक्ष ‘काऊंट इटो' ह्या नांवाचा होता. सुयंत्रित राजशासन पद्ध- तिची रचना करण्याचे श्रेय पुष्कळ अंशीं व मुख्यतः ह्यासच आहे.

 मुखत्याराच्या सभेत तीनशें सभासद असतात. त्यांची मुदत चार वर्षांची असते. त्यांतील मेंबराचें वय ३० वर्षांचे तरी असावें लागतें. व सर्व प्रकारच्या कराबद्दल मिळन सरकारांत तो दरवर्षी निदान १५ डालर्स तरी भरीत आहे, असा पुरावा लागतो. एक डालर ह्मणजे सुमारे सव्वादोन