पान:जपानचा इतिहास.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
जपानचा इतिहास.

 अगदी पूर्व काळापासून जपानी सरदारांचे दोन वर्ग आहेत. एक दायमियो हा वर्ग व दुसरा कुगे हा वर्ग राजाचा वडील मुलगा गादीवर बसे व धाकट्या मुलांची कूगे ह्या सरदार वर्गात गणना होई. दामियोनीं जेव्हां आपला जमि- नीवरचा हक्क सोडून दिला तेव्हां त्यांची गणना कूगेबरोबर होऊं लागली; व त्या दोन्ही वर्गाला पुष्पकुटुंबे अशा अर्था- ची संज्ञा मिळाली. युरोपांत ज्याप्रमाणें ड्यूक, मार्किस, काउंट व्हायकाउंट, व बॅरन अशा एकाखाली एक पांच दर्जाच्या सरदारक्या आहेत. त्याप्रमाणे तशाच नमुन्याची व्यवस्था १८८४ साली करण्यांत आली. त्यापैकीं कांहीं पदव्या जुन्याच सरदार लोकांना देण्यांत आल्या. ज्या कोणी सर- कारी कामांत हुशारी दाखविली त्या इतर कांहीं लोकांनांही ह्यांतल्या कांहीं पदव्या मिळाल्या. ह्या सर्व सरदारांना तैनाती चालू असतात. परंतु सरकारच्या परवानगीवांचून त्यांना लग्नवगैरे कांहीं करितां येत नाहीं. 'ही सरकारनें “ हाऊस ऑफ लॉर्डस " ह्या सभेची आगाऊ तयारीच करून ठेवली ह्मणावयाची.

 १८८२ ह्या वर्षी पूर्वीच मंत्रिमंडळ मोडून टाकून युरो- पियन पद्धतीवर कॅबिनेट बनवून राज्यकारभार सुरू झाला. मोठमोठ्या हुद्यावर चांगले शिकलेले असे लोक नेमण्यांत आले. कार्मे थोडीं व कामगार फार अशी जी पूर्वीची पद्धत होती ती बंद करण्यांत येऊन बरेच कामगार लोक पूर्वीपेक्षां कमी करण्यांत आले. त्या योगानें खर्च बराच कमी झाला. ह्या सर्व फेरमोबदल्यांनी जपानी लोकांच्या मनावर असा