पान:जपानचा इतिहास.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
जपानचा इतिहास.

किंवा १८६७ सालीं जी राज्यक्रांति झाली व ज्या राज्य- क्रांतीस त्यांनी 'मैजी ' ह्म० ' विख्यात कारकीर्द ' असें नांव दिले आहे, त्या सालापासून मोजतात. ज्या ख्रिस्ती लोकांना केवळ त्यांच्या धर्मासाठींच ह्मणून बंडीत टाकळें होतें त्या ख्रिस्ती लोकांना ह्या सालीं सोडून देण्यांत आले.देवी काढण्याचा प्रघात सुरू झाला. ह्याच वर्षी जपानी लोक फोटोग्राफीची कला शिकले व आतां त्या कलेत ते बरेच निष्णात झाले आहेत. जपानी लोकांचा लांबचलांब पोकळ पोषाक कामाकाजाच्या वेळी गैरसोईचा वाटू लागला ह्मणून प्रत्येक कामगारानें कामाच्या वेळीं युरोपियन पोषाकच घातला पाहिजे, असा नियम करण्यांत आला.

 प्रजासत्ताक राज्यपद्धतिः - जपान देश पूर्वीपासून अगदर्दी एकसत्ताक बादशाही अमलाचा होता. परंतु आतां तेथें बादशाही अमलानें मर्यादित अशी प्रजसत्ताक राज्य- पद्धति सुरू झाली आहे.

 १८६८ सालीं मिकाडोनें जेव्हां राज्यसूत्रे आपल्या हातांत घेतलीं तेव्हां असे जाहीर केलें होतें की, आम्ही सल्लामसल- तगार अशी एक सभा स्थापन करून सर्व कामें लोकमताच्या अनुरोधानें करीत जाऊं. अशी मिकाडोनें आपली इच्छा प्रदर्शित केली खरी, परंतु राजकीय गोष्टीवर स्वतंत्रपणे विचार करण्याची त्या लोकांना पूर्वीपासून कधींच संवय नसल्याकार- णानें लोकमत प्रदर्शित करणाऱ्या संस्था चांगल्याशा भरभरा. टीला येईनात. ह्मणून त्या गोष्टीचें त्यांना शिक्षण देणे भाग पडलें.

 प्रजासत्ताक राज्यपद्धति पूर्णपणे अमलांत येण्यापूर्वी राज्य- व्यवस्था ज्या धोरणावर चालली होती ते धोरण असें. राजा,