पान:जपानचा इतिहास.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वे.

९९


पाश्चात्य लोकांप्रमाणे कामाची शिस्त लागावी ह्मणून लष्कर वगैरे सर्व खात्यांत त्यांनी बहुतकरून युरोपियन व अमेरिकन अमलदारांची नेमणूक केली. ज्या देशांतील लोक परकी- यांना रानटी गणून थोडक्याच काळापूर्वी अगदीं तुच्छ मानीत असत, त्याच लोकांनी लवकरच परकीयांची किंमत समजून आल्याबरोबर आपखुषीनें केवळ आत्मसुधारणेसाठीं आपल्यावर अधिकारी नेमून घ्यावें ही खरोखरच गुणग्राहकता नव्हे काय ? हा सत्यैकदृग् निरभिमान नव्हे काय ? हा हित प्रेरित पूर्ण देशाभिमान नव्हे काय ? हें अत्यंत दूरदर्शित्व नव्हे काय ?

 १८७१ साली ज्या सुधारणा अमलांत आल्या, त्यापूर्वी ज्या लोकांना बहिष्कृत मानीत असत त्यांना इतर लोकांसा- रखे हक्क मिळाले, पोष्टाची व तारायंत्राची स्थापना झाली. ' नाणी पाडण्याकरितां टांकसाळ सुरू झाली, विद्याखार्ते थेट सरकारच्या मंत्रिमंडळाच्या हातांत आलें व टोकियो येथें विश्वविद्यालयाची स्थापना झाली.

 १८७३ साली ज्या सुधारणा अमलांत आल्या त्या. पहिली रेल्वे सुरू झाली; यूरोप वगैरे सर्व खंडांतील राज्यांत जपान सरकारने आपले वकील पाठविले व रस्त्यानें कोणी उघडें बोडकें हिंडूं नये असा कायदा झाला. ह्याच वर्षी कालगणनेची पाश्चात्य पद्धति जपानांत अमलांत आली. आतां जपानी लोकांच्या व पाश्चात्य लोकांच्या शकामध्ये मात्र भेद आहे. बाकी त्यांच्या तारखा महिने वगैरे सर्व एकच. ' त्यांचा अगदीं पहिला मिकाडो जेव्हां गादीवर बसला अशी त्यांची समजूत आहे तेव्हांपासून ते आपला शक मोजतात,