पान:जपानचा इतिहास.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
जपानचा इतिहास.

यावयाचा नाहीं, अशी एकदा खात्री झाली मात्र, तोंच दाय- मियोनीं अप्रतिम स्वदेशाभिमानाच्या स्फूर्तीनें आपला देश इतर देशाच्या रांकेला बसण्यास योग्य व्हावा ह्मणून आपण होऊन पटापट आपले सर्व हक्क सोडून दिले. त्यांच्या चाकर माणसांची, व शिपाई प्याद्यांची थेट मिकाडोकडे नेमणूक झाली. इ. स. १८७१ ह्यावर्षी टोकियो येथें सर्व सरदार ले व त्यांचे हक्क काढून घेतल्याचा खलिता मुख्य प्रधा- नानें मिकाडो देखत दरबारामध्ये जेव्हां वाचून दाखविला तेव्हां खालीं माना करून त्या गोष्टीस आपली सम्मति त्यांनी प्रदर्शित केली.

 किरकोळ सुधारणा -- मिकाडो आपल्या प्रजाजनांत मिळून मिसळून वागूं लागल्याबरोबर त्यानें आपण होऊन जाहीर केलें कीं, "पूर्वीच्या रानवट चाली असतील त्या सर्वांनी आतां टाकून द्याव्या. कलाकौल्य व विद्या ह्यांच्या संपादनाकडे सर्वांनी लक्ष पुरवावें. कारण कीं, आपणाला बळकट पायाची एक राष्ट्र रूप इमारत उभारावयाची आहे. "

 ह्याकामी बुद्धिमान् जपान्यांनी बादशहाला फार मदत केली. त्यांनी ठिकठिकाणी कॉलेजें व हायस्कुले स्थापून त्यांत पाश्चात्य ज्ञानामृत पाजण्याचा क्रम झपाट्यानें व मोठ्या उल्हासाने चालविला. स्माइल्सच्या सेल्फ हेल्थ सारख्या ग्रंथांची भाषांतरें करून आपल्या लोकांमध्ये एकप्रकारची नवी तरतरी उत्पन्न केली. कलाकौशल्याचा आपल्या राष्ट्रांत अभ्युदय व्हावा ह्मणून सरकारानेही परदेशाहून त्या त्या कलेत निष्णात असलेले मोठमोठे पगार देऊन आपल्या देशांतील लोकांना शिक्षण देण्याकरितां आणलें. आपणास