पान:जपानचा इतिहास.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १७ वें.

९७


योग्य नाहीं; अर्से वाटून त्यानें येड्डो हीच आपली राजधानी केली; व तिला टोकियो ह्म० पूर्वप्रांताची राजधानी असे नांव दिलें. तींत त्याने मोठ्या समारंभानें व थाटानें उघडपणानें प्रवेश केला.

 इतक्या सर्व उलाढालींत मुळींच कटकट झाली नाहीं, असें नाहीं. थोडीशी झाली. कैकी हा शोगुन पराकाष्ठेचा भितरा व शंकेखोर होता. त्याने आपल्या जागेचा राजीनामा लोकांचा कल पाहून पूर्वीच दिला होता, हें वर सांगितलें आहेच. तरी पुराणप्रिय लोक हे कोठेंही असावयाचेच. त्या- चप्रमाणें ते त्यावेळी जपानांत होते. त्यांनी शोगुनला खंडोबा करून बंड माजविलें, बंडवाल्यांचा व राजाचा एक मोठा संग्राम झाला. हा संग्राम एकसारखा तीन दिवस चाडला होता. शेवटी शोगुनच्या सैन्याचा मोड होऊन थोडक्याच दिवसांत मिकाडोची सत्ता अप्रतिहत चालू लागली. व शोगुन ह्मणजे इतर सामान्य लोकांप्रमाणेच भशी सर्वत्र समजूत लवकरच दृढ झाली.

 जहागीरदारींचा लय- पाश्चात्य सुधारणेच्या अवलो- कनाचा जपानच्या लोकांवर जसा परिणाम झाला, तसा इतर कोणत्याही राष्ट्रावर झाला नाहीं झटले असतां यत्किंचितही अतिशयोक्ति होणार नाहीं. पाश्चात्य शासनपद्धतीतले उत्तम गुण त्यांच्या मनावर इतके बिंबले व पाश्चात्य संस्थांपासून होणारे फायदे पाहून त्यांच्या तोंडाला इतके पाणी सुटलें कीं, त्या आशेवर आपल्या जमिनी, वतनें, हक्क वगैरे सर्व सोडून देण्यास ते तयार झाले. जोपर्यंत जहागीरदार प्रत्येकजण स्वतंत्र आहे, तोपर्यंत आपल्या देशाला राष्ट्रीयपणा कांहीही