पान:जपानचा इतिहास.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
जपानचा इतिहास.

णापासून कदाकाळीं झालें तर आपले हितच होईल. नुकसान 'कधीही व्हावयाचें नाहीं. त्याचप्रमाणे इतर देशांतल्या राजांची जशी आपापल्या देशांत इभ्रत आहे व परकी देशांत योग्यता आहे, तशी आपल्या राजाचीही व्हावी; व आपल्या राष्ट्राला इतर राष्ट्राच्या बरोबरीनें कोठेही जगांत मान मिळावा, अशी त्यांना फार उत्कट इच्छा होऊं लागली. एका प्रख्यात दाय- मियोनें शोगुनला अशा आशयाचे पत्र पाठविलें. त्या पत्रांतील मजकुराच्या यथार्थाबद्दल शोगुनचीही खात्री झाली. व आपल्या हातांतील सत्ता मुकाट्यानें मिकाडोच्या हातांत देण्यास तो तयार झाला.

 शगुननें राजिनामा दिला व मिकाडोच्या हातीं सत्ता आली. येणेंप्रमाणे कांहींही रक्तस्राव न होतां ही राज्यक्रांति झाली ह्मणावयाची. मिकाडोनें जगांतील सर्व राजांना स्वतः आपल्या सहीने पत्रे पाठवून कळविलें कीं, आजपासून सर्व सत्ता भी आपल्या हातीं घेतली आहे. मिकाडोचें नांव लोकांना कळले व त्यांतून तें स्वतः त्याच्याकडून अशी ही पहिलीच वेळ. १८६८ साली 'ओकूबो' नांवाच्या मुत्सद्यानें राजाला पत्र लिहिलें; त्याचा मतलब असा कीं, "आजपर्यंत आमचे राजे नेहमी पडद्याच्या आडच बसत आले आहेत, त्यामुळें गरीब प्रजाजनांचीं गान्हाणी आजपर्यंत थेट त्यांच्या काना- पर्यंत कधींच पोंचलीं नाहींत. सर्व सत्ताधारी प्रभूला हें योग्य नाहीं. करितां आपण पूर्वीची वहिवाट सोडून आपल्या + प्रजाजनांच्या दृष्टीस पडून त्यांचे नेत्र तृप्त करीत चला."

 ही गोष्ट मिकाडोला मान्य झाली. त्यावेळी त्याचें वय अठरा एकोणीस वर्षाचें होतें, कियाटो हैं शहर राजधानीला