पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मालकाने नोकराला विनाकारण शिवीगाळ केल्यामुळे ती घटना नीट लक्षात ठेवून नोकराने मालकाचा खून केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. म्हणून एखाद्या व्यक्तीवर रागावताना परिस्थितीचे भान असणे महत्त्वाचे ठरते. याबाबतची एक गोष्ट 'इसापनीती' त आढळते. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात कोंबड्या पाळल्या होत्या. एक कोल्हा नेहमी तेथे येई आणि कोंबडी चोरून नेई. फार दिवस प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्याला तो कोल्हा सापडला. त्याला पाहून शेतकरी रागाने बेभान झाला. संताप अनावर झालेल्या शेतकऱ्याला अविचार सुचला. कोल्ह्याला किती मारू आणि कसा त्रास देऊ असे त्याला झाले. त्याने एक जुना पंचा आणला; तो तेलात बुडवला आणि कोल्ह्याच्या शेपटीला व कमरेला बांधला आणि शेपटीला आग लावून दिली. बाजूला त्या शेतकऱ्याचे गव्हाचे पीक होते. ओंब्या वाळल्या होत्या आणि शेत कापणीला तयार झालेले होते. कोल्हा नेमका त्याच शेतात शिरला. सगळीकडे आग पसरली आणि शेतकऱ्याचे उभे पीक जळून गेले. शेतकरी रडत घरी आला आणि बायकोला केलेच. पण त्यापेक्षा जास्त नुकसान माझ्या रागाने म्हणाला, "कोल्ह्याने तर माझे नुकसान केले.” याचा अर्थ आपल्याला राग येऊच नये असे नव्हे. राग ही अनेक भावनांपैकी एक भावना आहे. पण राग येण्याला, तो प्रकट होण्यालासुद्धा काही मर्यादा आहेत आणि त्या आपल्या मनावर, व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतात. आपल्या घरातील एखादी मौल्यवान वस्तू नोकराच्या हातून फुटली तर त्याच्यावर आपण खेकसतो, नको नको ते बोलतो. पण तीच गोष्ट जर आपल्या पाहुण्यांच्या किंवा वरिष्ठांच्या हातून घडली तर...? 'जाऊ द्या हो. तुम्ही काय ती मुद्दाम फोडली का?' असे हसत हसत उद्गारतो. याचाच अर्थ 'राग येणे' या क्रियेमध्ये ती घटना कुठे, कधी आणि कुणाच्या बाबतीत घडली यावर तिची तीव्रता ठरते. एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की, व्यवस्थापनात वरिष्ठाकडून प्रकट केलेला राग हा व्यवस्थापनाचाच एक भाग असू ५० । जगण्यात अर्थ आहे..