पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अश्लील वाचन किंवा ब्ल्यू फिल्मस् यांमुळे तरुणांच्या भावना चाळविल्या जाऊन ते नको त्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करतात आणि एका क्षणासाठी त्यांनी केलेली चूक त्यांचे संपूर्ण आयुष्यच अंधारमय करून टाकते. यांतून शारीरिक आणि मानसिक प्रायश्चित्त मिळते. एडस्सारख्या महाभयंकर रोगाच्या तावडीत सापडून नंतर वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगांच्या संगतीने गलीतगात्र जीवन जगत मृत्यूची वाट पाहत ताटकळणे एवढेच त्यांच्या नशिबी उरते. तारुण्याच्या उंबरठ्यावरील किंवा स्वप्नसृष्टीत मशगूल असणारे अनेक युवक केवळ अशा घटनांमुळे मनोरुग्ण बनल्याची उदाहरणे आहेत. एडस्वर आज तरी एकच खात्रीशीर उपाय आहे, तो म्हणजे एड्स होऊ न देणे. एड्स किंवा इतर कोणताही गुप्त रोग होऊ नये, कोणतीही चूक आपल्या हातून कळत-नकळत घडू नये यासाठी लैंगिकतेचे किमान ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. म्हणून आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीस वयाच्या 'त्या' वळणावर शास्त्रशुद्ध लैंगिक शिक्षण मिळणे ही बदलत्या काळाची गरज वाटते. बदलत्या काळाची गरज | ३१