पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ । जगण्यात अर्थ आहे.. जबाबदार वर्तन अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे एड्सचा पहिला रुग्ण १९८१ मध्ये सापडला. एड्स म्हणजे काय ? तो कशामुळे होतो? तो कसा पसरतो? तो कसा पसरत नाही? त्याचे शरीरावर कोणकोणते परिणाम होतात? इत्यादी प्रश्नांची माहिती होते न होते एवढ्यात, म्हणजे १९८६ मध्ये तो भारतात अवतरला देखील. आज... परिस्थिती खूपच बदलली आहे. जगात ज्या ज्या देशात माणूस राहतो त्या प्रत्येक देशात एड्स आहे. जग अनेक रंगी, अनेक ढंगी आहे असे कितीही म्हटले तरी या पृथ्वीतलावरचा माणूस आणि माणसाची वर्तणूक सर्व ठिकाणी कमी- अधिक प्रमाणात सारखीच आहे. लैंगिक वर्तणूक हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक. त्यामुळे यातही विशिष्ट सारखेपणा