पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कातडीचे आणि गोऱ्या संस्कृतीचे आकर्षण मात्र दिवसेन्दिवस वाढत गेले. भाळी कुंकू ल्यालेली, डोक्यावरून पदर घेतलेली, अर्थातच भरजरी साडी नेसलेली, शालीन गृहकृत्यदक्ष स्त्री हे भारतीय संस्कृतीतील स्त्रीचे मूर्तिमंत रूप आजकाल पाहावयास मिळत नाही. आजकाल अशी मूर्ती शोकेसमध्ये आढळते. आजच्या गोन्या संस्कृतीत नटणारी, मुरडणारी, बॉबकट किंवा बॉयकट केलेली, चार-चौघात हिंडणारी, झालेच तर नोकरीबिकरी करून अर्थार्जन करणारी छानछोकी स्त्री सर्वांना हवीहवीशी वाटू लागली आहे. (बॉबकट- बॉयकट इत्यादी छानछौकी करू नये असे नव्हे; जरूर करावी; पण ते करणे त्या व्यक्तीला, वयाला, व्यवसायाला आणि वातावरणाला पोषक असावे.) त्वचेचा रंग ही एक नैसर्गिक देणगी असते. वैद्यकीय भाषेत बोलायचे झाले तर तो आनुवंशिकतेचा एक भाग असतो. आईवडिलांपैकी कोणी एकजण सावळे किंवा काळे असतील तर त्यांचे अपत्य काळे-सावळे, गव्हाळ निपजू शकते. त्यामुळे एखादी व्यक्ती गो रंगाची असणे हा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा भाग असत नाही. आपल्यापैकी अनेकजण नेमके हेच विसरतात. एखादी मुलगी गव्हाळ आहे किंवा काळी आहे, यापेक्षा ती किती कर्तृत्ववान, किती चांगल्या गुणांची आहे, चांगल्या स्वभावाची आहे, चारित्र्यवान आहे याचा विचार होत नाही. केवळ ती गोरी नाही, या एका- तिच्या हातात नसलेल्या- रूपदोषामुळे अनेक नियोजित वर तिला झिडकारतात. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या याच देशातील हे कटू सत्य आहे. गोरी बायको आणि त्याबरोबर आणखी बरेच काही हवे अशा पुरुषी हट्टामुळे काळ्या- सावळ्या बायकांइतकाच गोऱ्या बायकांवर होणाऱ्या पुरुषी अत्याचाराच्या सुरस सत्यकथांमुळे विवाह न करता आयुष्यभर एकट्या राहणाऱ्या सबलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही तमाम पुरुषवर्गाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकाने आपला जोडीदार कसा असावा हे स्वतः ठरवावे. ११० । जगण्यात अर्थ आहे..