पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अगदी ट्रॅक सोडून म्हणजे चाकोरीबाहेर जाऊन प्रश्न केले तर आज जे विवाह होतात त्यापैकी किती विवाहांत मुलींनी मुलाला पसंत केलेले असते? मुलाला नीट पाहिलेले असते? स्वत:च्या विचारांनी मुलाविषयी सविस्तर माहिती करून घेतलेली असते? मुलाच्या स्वभावाची चौकशी केलेली असते? मुलाशी विवाहापूर्वी संवाद साधलेला असतो? 'मला हाच जोडीदार का हवा आहे?' किंवा यापुढे जाऊन 'मला हा जोडीदार हवा आहे का?' या प्रश्नाचे उत्तर शोधलेले असते? अथवा अशा प्रश्नांची जाणीव मनात निर्माण केलेली असते? दुर्दैवाने आपल्या महान देशात वरील सर्व प्रश्नांच्या बाबतीत मुलीच नव्हे तर मुलेही उदासीन असतात असे दिसून येते. कारण मुलामुलींच्या विवाहाची काळजी मुलामुलींपेक्षा आपल्या भारतीय पालकांना असते. विवाहाची जबाबदारी कधी एकदा पार पाडतो असे त्यांना झालेले असते. त्यामुळे बहुतेक पालक आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार मुलामुलींचे हात पिवळे करतात. (आणि असे विवाह फसले की नंतर आपले तोंड काळे करतात हा भाग वेगळा.) क्रिकेटच्या धर्तीवर 'यादी पे शादी' नावाची 'वन डे मॅच' - मॅच कसली लग्नाचा पार खेळखंडोबा आजकालच्या फिक्सिंगमध्ये गुंतलेल्या पालकांनी करून टाकला आहे. आपल्या बौद्धिक, मानसिक आणि नैतिक विकल्पाचा मार्ग सुलभ होण्यासाठी स्त्री-पुरुषांनी लग्न करायचे असते याचा गंधही विवाहबंधनात अडकणाऱ्या अजाण जीवांना नसतो. विवाह म्हणजे काय हे जेव्हा समजते, तेव्हा त्यांचा अर्धा-अधिक संसार झालेला असतो. आजच्या संसारात वरपक्ष वरचढ मानला जातो. 'वधू'ची निवड करताना तिच्या सर्वांगीण गुणांचा विचार न होता, दुर्दैवाने आधी तिच्या शरीरसौंदर्याचा विचार केला जातो आणि वर हा डॉक्टर इंजिनियरपासून अगदी कंत्राटी शिक्षक (सॉरी! शिक्षणसेवक) ते कंत्राटी झाडूवाल्यापर्यंत कोणीही असो, तो नोकरीवाला हवा असतो. वरवर दिसणारा हा वरांतला फरक आहे. बहुतेक वर गोऱ्या चामडीच्या शोधात असतात. दीडशे वर्षे गोऱ्यांनी आपल्यावर राज्य केले. ते जाऊन साठएक वर्षे होऊन गेली; पण गोऱ्या रंग नको, अंतरंग पाहा । १०९