पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ । जगण्यात अर्थ आहे.. रंग नको, अंतरंग पाहा ‘गोरी बायको हवी’ हे उद्गार आजकाल केवळ जाहिरातीतच नव्हे, तर प्रत्येक विवाहेच्छू युवकाच्या ओठांवर दिसून येतात. अर्थात प्रत्येकाला गोरी बायको मिळतेच असे नाही; पण बायको मिळेपर्यंत ती गोरीच असावी हा हटवादीपणा नवरोबाचा नव्हे तर त्याचे मातापिता, बंधू-भगिनी, मित्र, स्नेही आणि सगेसोयरे इत्यादी इत्यादींचा असतो. सोयरीक जमणे आणि जमवणे ही आजकाल डोकेदुखीच. (की यासाठी पायपीट करावी लागत असल्याने पायदुखी झालेली आहे?) आपण सर्व बाबींनी, सर्व दृष्टींनी, सर्व अंगांनी विज्ञानाला जवळ केले. पण विवाह आणि विवाहपद्धती यांबाबतीत मात्र आपल्या कौटुंबिक रेल(चेल)गाडीने अजून जुने स्टेशन सोडलेले नाही.