पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुमच्या पोटी जरी जन्माला आली असली तरीही ती तुमची नव्हेत तुम्ही केवळ निमित्तमात्र आहात तुम्ही त्यांना तुमचं प्रेम द्या, पण तुमचे विचार मात्र देऊ नका. कारण त्यांना त्यांचे स्वत:चे विचार आहेत तुम्ही त्यांच्यासारखे खुशाल व्हा पण, त्यांना तुमच्यासारखे बनवण्याचा अट्टाहास करू नका. कारण जीवन हे भूतकाळात रेंगाळत नसतं त्याला भविष्याचा वेध असतो तुम्ही आईबाप त्याचे एक धनुष्य आहात तुमची मुले त्यातून सुटलेले तीर आहेत त्यांना वेग येण्यासाठी वाकणं, हाच तुमचा आनंद आहे. म्हणून प्रिय पालकहो, तुमचं मूल संस्कारक्षम होण्यासाठी, त्याचं मूलपण गुदमरून न जाता त्याला त्याच्या सभोवतालचं विश्व मुक्तांगण होण्यासाठी, त्याचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी, त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होण्यासाठी, त्याचा विकास होण्यासाठी... आणि सर्वांत महत्त्वाचं तुमच्या घराचं घरपण टिकण्यासाठी, टिकविण्यासाठी कळकळीनं सांगावंसं वाटतं, मुलांना प्रेम द्या. त्यांना मुठीत नको, मिठीत ठेवा. - । १०७