Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 3ර 'भक्तसखा गोविन्द हरी हा आनन्दाचा कन्द ॥ ध्रु० ॥ सजलिनीरदशयाम तनू, नवरत्नखचित सौवर्ण मुकुट, शिरपेच, तुरा, वरेि कल्गि विराजत, कुटिलालक, निटिलासि कस्तुरीतिलक, केशरी गन्ध” ॥ १ ॥ येथे कडब्याचा शेवट आणि ध्रुवपदाचा शेवट यांचा सम्बन्ध यमकाने जुळविला आहे. कडव्यांत अष्टमात्रक गणाचीं नक्षू आवर्तनें असून दहाव्या आवर्तनांत सशब्द मात्रा तीन वा दोन आहेत. कडवें प्राचीन पद्धतीप्रमाणे सलग छापलेलें आहे. तें पद्य आहे हें दाखविण्यासाठी त्याचे पुढीलप्रमाणे चरण पाडून दाखवितां येतील:- । सजलनीरदश्याम तनू, नव-। रत्नखचित सौंवर्ण मुकुट, शिर- पेच-तुरा, वर कल्गि विराजत, । कुटिलालक, निटि- लासि कस्तुरीतिलक केशरी- गन्ध, गद्य वाचतांना अर्थानुरोधाने विराम घेत गेल्यामुळे त्याचे जसे तुकडे पडतात तसे तुकडे पाडून ते ओकाखाली ओक असे येथे छापले आहेत. चरणरचना अनियमित दिसत असल्यामुळे पद्य-मुमुक्ष्णूंना ब्रह्मानन्द होअील; परन्तु पद्य म्हणून वाचतांना सामान्य वाचकांचा घोटाळाच व्हावयाचा. चरणान्तीं विराम आहे की नाही आणि असल्यास तो किती मात्रांचा आहे या गोष्टी निश्चित नाहीत म्हणून सहज ध्यानांत येत नाहीत. चरणांतील पहिली टाळी ही चरणारम्भींच पडते, का काही मात्रा झाल्यावर पडते, आणि तसें असल्यास किती मात्रा झाल्यावर पडते या गोष्टीहि निश्धित नाहीत. कटिबन्धाची रचना सलग वाचावयाची असते म्हणून ती सलग छापण्यांत येते; युक्त हॅच होय. आवर्तनान्तीं नुसते खटके येतात आणि खटक्याखटक्यांनी यमकें साधलेलीं असतात. तेव्हा खटक्याच्या अनुरोधाने तुकडे पाडून छापल्यास वाचकांचा निदान गोन्धळ तरी होणार नाही. वरील पद्यांतील दुस-या कडव्याचे चरण खटक्याखटक्यांनी पुढीलप्रमाणें पाडतां येतील:-