पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ५६२ आल्याने त्यांचें विवेचन निष्कारण पाल्हाळिक आणि मूलतः सदोष झालें आहे. तथापि ओकन्दरीने पाहतां छन्दःशास्त्राच्या आितिहासांत, ज्यांत स्वतन्त्रपणाने बुद्धि चालविण्याचा प्रयत्न करण्यांत आला आहे असा हा पहिलाच ग्रन्थ आहे. २३ छन्दोलङ्कार साहित्यकुसुमाञ्जलि अथवा छन्दोलङ्कार नावाचा एक ग्रन्थ रा. गणेश विष्णु देशपांडे म्हणजे श्रीगड्गाधरदास वडकशिवालेकर यांनी लिहून खिस्तशके १९१२ मध्ये प्रकाशित केला आहे. याच्या पूर्वार्धांत छन्दोविवेचन असून असून फटके, कटाव, लावण्या, पदे इत्यादि पद्यप्रकारांची पुसट ओळख करून दिली आहे. मराठी ग्रन्थांत हें पुस्तक अत्यन्त व्यापक आहे. पद्याला लयबद्धतेची आवश्यकता आहे या गोष्टीची जाणीव याच ग्रन्थकाराला प्रथम झालेली दिसते. तो म्हणतो * छन्द अगर वृतें यांना ताल व सूर यांचें साहाय्य पाहिजे असल्याने प्रस्ताराने सिद्ध होणा-या असहुष्य वृत्तांपैकी जीं वृतें ताल व सूर यांवर म्हणतां येतील त्यांना पद्य म्हणावें; आणि जीं तशीं सहसा म्हणतां येणार नाहीत त्यांना गद्य म्हणावें हें उत्तम. मग गद्यामध्ये सरळ असणारी वाक्यरचना त्यांत असो वा नसो ” (पृ. ६). पण या धोरणाने छन्दःशास्त्राची पुनघटना करण्याचें कार्य केलें पाहिजे हें त्याला सुचलें नाही. या ग्रन्थाला योग्य प्रसिद्धि मिळालेली नाही. या अितिहासांत आणखीहि दोन ग्रन्थांचा झुछेख केला पाहिजे. 2४ छन्दःप्रभाकर छन्द:प्रभाकर हा ग्रन्थ हिन्दत असून तो साहित्याचार्य रायबहादुर जगन्नाथ प्रसाद, विलासपूर, यांनी लिहून आपल्याच 'जगन्नाथ? छापखान्यांत छापून प्रकाशित केला आहे. खिस्तशके १९३१ मध्ये प्रसिद्ध झालेली या ग्रन्थाची आवृति ही ७ वी होय. यावरून या पुस्तकाच्या प्रसाराची कल्पना होऔील. अितरत्र माझ्या पहाण्यांत न आलेलीं किती तरी वृतें या ग्रन्थांत आहेत. परन्तु हीं वृतें आणि त्यांचीं नांवें कोठून घेतली, त्यांचीं शुदाहरणें कोणत्या ग्रन्थांत आहेत या गोष्टींविषयी कांहीच स्पष्टीकरण नसल्याने त्यांचा सङ्ग्रह करणें झुचित वाटलें नाही. यांनी परिशिष्टांत अरबी-फासीं वृत्तांचा विचार केला आहे.
पान:छन्दोरचना.djvu/585
Appearance