पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५६१ छन्दःशास्त्राच्चा भितिहास आहे. या पुस्तकाची खिस्तशके १८६६ मधली आवृति (दुसरी) माझ्याजवळ आहे. छन्दीमत्र्जरींतून बरींच उदाहरणें वृत्तदर्पणांत घेतलीं आहेत. परशुराम तात्यांनीहि वियोगिनी वृत्त दिलें नाही! पण अभड्ग, ओवी, घनाक्षरी, दिण्डी, साकी यांचा परामर्श घेतला आहे. कामदा, शुद्ध कामदा, ललित, मन्दारमाला आणि अमृतध्वनि हीं नांवें प्रथम या ग्रन्थांत आढळतात. सम्प्रदायाप्रमाणे हीं नांवें कोटून घेतलीं हें साङ्गितलें नाही. यूथिका, विभावरी हीं वृत्तें प्रथमच येथे भेटतात. यूथिका नांव चालेल पण विभावरी नांवाचें एक वृत्त हेमचन्द्राने पूर्वीच साङ्गितलें असल्यानें तें नांव निराळ्या वृत्तासाठी योजणें चुकीचें आहे. वृत्तदर्पणकार मदिरावृत्ताला झुमा म्हणतात आणि हेमकला वृत्ताला मदिरा म्हणतात. सवाआि ही मोघम संज्ञा त्यांनी दोन भिन्न वृत्तांना लाविली आहे. *प्राकृत लोक न जाणचि मूळ, झुर्गेचि हिला कथितात सवाअी” असें निरङ्गनमाधव म्हणती तें काही खोर्ट नाही. सुबोध आणि औकमेवाद्वितीय शालेय पुस्तक म्हणूनच वृत्तदर्पण हें अितकें सुपरिचित झालें आहे की सामान्यतः बोलतांना छन्दःशास्त्रविवेचन करणा-या कोणत्याहि पुस्तकाला वृत्तदर्पण म्हणतात. २२. राजवाडेकृत मराठी छन्द सुप्रसिद्ध आितिहाससंशोधक विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा मराठी छन्द हा निबन्ध स्वतन्त्र पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. यांत त्यांनी चूर्णका, सवाष्औी, छप्पा, साकी, दिण्डी, घनाक्षरी, कटाव, अभङ्ग आणि ओवी या मराठी छन्दांचें विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. राजवाडे यांनी काही कल्पकता दाखविली असली तरी त्यांचें विवेचन साधार, सोपपत्तिक आणि निर्णायक वाटत नाही. कामांत निष्काळजीपणाहि झाला आहे. दुस-या परिच्छेदांत चूर्णकेचें जें लक्षण प्राकृतपिङ्गलांतील म्हणून देण्यांत आलें आहे तें वस्तुतः गड्गादासाच्या छन्दोष्मज्ञरीच्या सातव्या स्तबकांतील आहे. सवाअी हा शब्द फासीं असून त्याचा अर्थ ' सारखा ” असा आहे ह त्यांचें विधान खरें नाही. सवाअी हा शब्द प्राकृत पैङ्गलांत आल्याचें ते लिहितात, पण प्राकृत पैङ्गलांत हा शब्द नाही असें प्राकृत शब्दसूचीवरून दिसतें. तसेंच शष्करी आणि साकी यांचा जोडून दिलेला सम्बन्ध केवळ काल्पनिक आहे. घनाक्षरीचा विचार करतांना तो छन्द लगत्वभेदातीत आहे हें ध्यानांत न 弓。我守
पान:छन्दोरचना.djvu/584
Appearance