Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३१ काही छन्दोविषयक प्रश्न रचना होॠ लागली. तेराव्या शतकाच्या शेवटीं तर श्लोकबद्ध सयमकरचनेचा प्रघात पुष्कळच पडला आणि चौदाव्या शतकापासून ते नवीं नवीं वृतेंहि योजं लागले. कृष्णमुनीने शके १५७४ च्या सुमारास लिहिलेलें ‘ रुक्मिणी स्वयंवर' आणि ओङ्कारमुनीने शके १६३० च्या सुमारास लिहिलेलें 'लक्ष्मणास्वयंवर ” या काव्यांत पाच-अक्षरी वृत्तापासून ते वीस-अक्षरी वृत्तांपर्यन्त अनेक वृत्तें योजिलीं आहेत. मुक्तेश्वराने आपल्या रामायणाची रचना विविध वृत्तांत केली आहे तरी भुजङ्गप्रयाताचें प्रमाण मोठं दिसतें. शेवटीं शेवटीं पादाकुलक जातीचाहि अव वाटते. वामनाने अनेक वृत्तांत रचना करून मराठी भाषेला रुळविली आणि वृत्तरचनेला यमकानुप्रासांनी मण्डित करून 'सुश्लोक वामनाचा” सुप्रसिद्ध वाटते. वामनापासून चमत्कृतिजनक रचनेला विशेष महत्व येअं लागलें, विठ्ठल नि आनन्दतनय यांची रचना दुर्बोध आणि चमत्कृतिजनकच विशेष आहे. रघुनाथपण्डिताची रचना मात्र जितकी सालङ्कृत तितकीच रसाळ आणि शुद्ध आहे; पण ती विपुल नाही. 'विद्वजीवन’कार विठ्ठल मुद्रालङ्काराने विविध वृत्तांचीं नावें ग्रथित करितो पण त्यांत ढोबळ चुका करतो. अनन्त कवीने देवराज, प्रमाणिका, विबुधप्रिया, विभावरी आणि श्येनिका या दुर्मिळ वृत्तांचा मोठ्या प्रमाणांत झुपयोग केला आहे. निरञ्जन-माधवाने विविध वृत्तांत चमत्कृतिजनक आणि विपुल रचना केली असून छन्दःशास्त्रावरहि सदृत मुतावलि ही पुस्तिका लिहिली आहे. कवि हा भाषेचा पालक आहे ही जाणीव सदैव मनांत वागवून व्याकरणशुद्ध, प्रौढ आणि सुसंस्कृत भाषेत निरनिराळ्या कठिण वृत्तांतहि विपुल आणि १ प्रो. वि. भि. कोलते यांचा 'महानुभावीय काव्यांतील कांहीं नवीन छन्द!” (संधिकाल, ऑगस्ट १९३५ चा अंक) हा लेख पहा.