Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/571

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Agص दोन क्षुदाहरणें अश्वघोषाच्या सौदरनन्द काव्यांत (१२-४३, १३-५६) अशीं आहेत. पुन्हा सिंहरेखा नांवाचें जें वृत्त भरत देतो तें पिङ्गल देत नाही पण या वृत्तांत तर महाभाष्यांतील (खंड १, पृ. ५०२) दोन कारका आहेत. अिन्द्रवंशा वृत्त भरत देत नाही ही गोष्टहि विचारणयि आहे; कारण अिन्द्रवंशा वृत्तांत रचना फार झुशीरा होअं लागली. भरताविषयी आणखी एक चिन्तनीय गोष्ट अशी कों जों वृत्तें प्रमाणिका, विद्युन्माला, द्रुतविलम्बित, भुजङ्गप्रयात, स्रग्विणी, रुचिरा, मालिनी, हरिणी, मन्दाक्रान्ता, पृथ्वी आणि कुसुमितलतावेछिता या नांवांनी सुप्रसिद्ध आहेत त्यांना नाट्यशास्त्रांत अनुक्रमें मत्तचेष्टित, विद्युलेखा, हरिणीप्लुता, अप्रमेया, पद्मिनी, प्रभावती, नान्दीमुखी, वृषभललिता, श्रीधरा, विलम्बितगति आणि चित्रलेखा हीं नांवें आहेत. पण भरत वसंततिलका हें नांव मात्र ग्राह्य मानतो; सिंहोन्नता वा उद्धर्षिणी या प्राचीन नांवांपैकी एखादे नांव तो देत नाही ! ३ वराहमिहिराची बृहत्संहिता आपल्या बृहत्संहिता या विविधविषयात्मक ग्रंथाच्या १०३ व्या ग्रहगोचरनाम अध्यायांत वराहमिहिराने 'श्रुतिसुखदवृत्तसङ्ग्रह' केला आहे. वृत्त हा काही या अध्यायाचा विषय नाही. पण प्रतिपाद्य विपयाची माण्डणी सहेतुकपणें विविधवृत्तांत केली असून त्या त्या श्लोकांत वृत्ताचें नांव ग्रथित केलें आहे. शार्दूलविक्रीडित हें नांव मात्र सम्पूर्ण ग्रथित करण्यांत आलें नाही, वराहमिहिर शार्दूल म्हणतो. तथापि हा वराहमिहिराचा व्यापार आश्चर्यकारक आहे यांत शङ्का नाही. ज्या वृत्तांना पिङ्गल प्रमाणिका, दोधक, वरतनु वातोर्मि, हरिणी, पृथ्वी आणि अवितथ म्हणतो त्यांना अनुक्रमें वराहमिहिर हा स्थिर, दोथक (हें केवळ सार्थ शब्दरचनेसाठी असेल), मालती, ऊर्मिमाला, वृषभचरित, विलम्बितगति आणि नकुंटक म्हणतो. वृषभचरित आणि विलम्बितगति या दोन नांवांपुरता तो भरताचा सम्बन्धी आहे. पिङ्गलाने न साङ्गितलेलीं अशीं प्रसभ, अनवसिता, दुप्तपद, ललितपदा, लक्ष्मी आणि समदविलासिनी हीं वृत्तें तो नवीन देती. पण ग्रन्थांत इतरत्र त्याने मोटनक (वबू ४६२६), शुद्धविराटू (वबू ५॥३८), विद्युन्माला (ववृ ६८॥२७), रुक्मवती (वबू ६३॥२) आणि तोटक (वबू ४६॥११) हीं वृतें वापरलीं असून त्यांचा समा