पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५४७ छन्दःशाख्ञाचा अितिहास मानणें हा प्राकृत सम्प्रदाय असावा. अवितथादि गेय वृतें जेव्हा प्राकृत काव्याच्या द्वारा परिणत होऊन संस्कृतांत आलीं तेव्हा पिङ्गलादि छन्दःशास्त्रकारांस आवर्तनाची कल्पना नसल्याने त्यांचा घोटाळा झुडाला. त्याचप्रमाणे त्र्यक्षरी गणांचें विवेचन नाट्यशास्त्रांत कां असावें कळत नाही, कारण भरत त्या परिभाषेचा उपयोग वृत्तलक्षण साङ्गतांना करीत नाही. तो वृत्तविचार दोन ठिकाणीं करतो; प्रथम सुपरिचित वृत्तांचा १६ व्या अध्यायांत आणि नन्तर धुवांच्या निमित्ताने गेय वृत्तांचा ३२ व्या अध्यायांत. ३२व्या अध्यायांत तो प्राकृत झुदाहरणें देतो. पण प्राकृत जातींचा विचार तो मुळीच करीत नाही. भरताची वृत्तलक्षण साड्गण्याची पद्धति प्राथमिक अवस्थेतील दिसते, म्हणून भरत हा पिङ्गलाच्या पूर्वीचा असावा अशी शङ्गा येते. अमुक अितक्या अक्षरांच्या चरणांतील अमुक अमुक अनुक्रमांचीं अक्षरें गुरु आणि झुरलेलीं सारी लघु अशा रीतीनें लक्षण ओक वा दोन अनुष्टभू श्लोकांत साड़िगतलेलें असतें जर्से, आाद्यात्पराणि पञ्चैव द्वादशं सत्रयोदशम् । अन्त्यं सप्तदशे पादे शिखरिण्यां गुरूणि च ॥ (भ १६॥७६) काही वृत्तांचीं लक्षणें त्या त्या वृत्तांत ग्रथित केलेलीं आढळतात; ही सुधारणा मागाहून मूळांत कोणीतरी दुस-याने केली असावी. लक्षणामागून त्या वृत्ताचें झुदाहरण दिलें असून झुदाहरणाच्या चौथ्या चरणांत वृत्ताचें नांव ग्रथित केलेलें असतें. जसे, महानद्याभोगे पुलिनमिव ते भाति जघनं तथा ऽऽस्ये नेत्राभ्यां भ्रमरसहितं पड़कजमिव । तनुस्पर्शश्चायं सुतनु सुकुमारो न परुषः स्तनाभ्यां तुंगाभ्यां शिखरिणिनिभा भासि दयिते ॥ (भ १६-७७) झुदाहरणे बहुशः अशी शुङ्गारिक आहेत. भरताने दिलेल्या वृत्तांत दोन वृतें विचारणीय आहेत. तीं पिङ्गलाने दिलेलीं नाहीत पण त्यांचीं झुदाहरणें दुर्मिळ असलीं तरी तीं सुप्रसिद्ध वाङ्मयांत आहेत. हीं दोन वृतें म्हणजे मेघमाला नि शरभललित हीं होत. मेघमालावृत्ताचें झुदाहरण भासाच्या प्रतिमानाटकांत (३॥३) आहे आणि शरभललित वृत्ताचीं
पान:छन्दोरचना.djvu/570
Appearance