Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RNS काही छन्दोविषयक प्रश्न लाने दिली असावींत. त्यांचा समावेश तो गाथाप्रकरणांत करितो. १९ मराठींतील पद्यरचनेचा अितिहास पद्यरचनेचे छन्द, जाति आणि वृत्त हे जे तीन मुख्य प्रकार आहेत त्या तिन्ही प्रकारची पद्यरचना आजपर्यन्त मराठींत चालू आहे. (१) छन्द.—अभङ्ग, ओवी, घनाक्षरी अित्यादि पद्यप्रकाररांत लघुगुरु हा झुचारायचीं असतात. अर्थात्, या पद्यप्रकारांत मुख्य नियमन अक्षरसङ्ख्येचें दिसतें. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारांत अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोनच आवर्तनांची रचना होॠ शकते. या लग म्हणून वैदिकपद्यप्रकाराला असणारें छन्द हें नाव दिलें आहे. कोणत्याहि नियमबद्ध पद्यप्रकाराला सामान्यपणें छन्द वा वृत्त म्हणतात, जसें पृथ्वी छन्द, वैतालीय छन्द, गीतिवृत्त अत्यादि. परन्तु वृत्तास जसा विशिष्ट पारिभाषेिक अर्थ देण्यांत आला आहे तसा छन्द या शब्दास देण्यास प्रत्यवाय नसावा. अलीकडे छन्दांत रचना करण्याकडे कवींचें लक्ष्य अधिकाधिक जाअं लागलें आहे. विशेषतः यवतमाळचे विद्वान् आणि व्यासड्गी कवि वामन नारायण देशपाण्डे हे सहेतुकपणे छन्दांत विविध रचना करितात. (२) जाति-जातिरचनेंत लगल्वभेद आहे. समरचनेंतहि अक्षरांची सङ्ख्या नि लगक्रम हीं अभिन्न नसतात. तथापि लघूची ओक मात्रा' आणि गुरूच्या दोन मात्रा या गणिताने मात्रांची सङ्ख्या सारखी भरते. मात्रांची सङ्ख्या हें ओकच काही या पद्यप्रकाराचें लक्षण नाही. या मात्रासङ्ख्या १ ** अत्र शास्रे नामोद्देशेन यन्नोक्तं छन्दः प्रयोगे च दृश्यते तद्भाथेति मन्तव्यम्” (हपि १५५) २ ‘मीयते अनया सा मात्रा’

    • चाषस्तु वदते मात्रां, द्विमात्रं त्वेव वायसः

शिखी रौति त्रिमात्रं तु नकुलस्तत्वर्धमात्रकम” (पाणिनीय शिक्षा ४९)