Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने R काही छन्दोविषयक प्रश्न वाढवून तें अष्टमात्रक तरी करून घेतलें पाहिजे अथवा तेवढा भाग म्हणतांना प्रतिमाहे तुझीच हृदीं विलसे. ध्रु० मी करी पूजा तियेची भावपुष्यें वाहुनी, आणि पुष्पें कोणतीं पूजेस झुखी यांहुनी? परेि ती न कधीच बधे हसुनी भिजवी न कधी मन शान्तिरसें.” १ (ग १०४) वृत्त-वृत्तांचें वा वृत्त-जातींचें मिश्रण घोटाळा श्रुत्पन्न करीत नाही; कारण, अक्षरें जशीं लिहिलेलीं असतात तशींच वाचायचीं असतात. वृत्त आणि जाति दोन्हींतहि लगभेद आहे. परन्तु वृत्त आणि छन्द, वा जाति आणि छन्द यांचें मिश्रण युक्त नाही; कारण ओक भाग वाचतांना लगभेदाकडे लक्ष्य द्यावें लागतें तर दुसरा भाग वाचतांना, लिखित लघु असो वा गुरु असो प्रत्येक अक्षर गुरूच झुचारायचें असतें. म्हणून करेकृत 'मेघाचें अक्षुगीत’ या कवितेंतील

  • येसि कधी घेझुने ज्योत्से, किरणपुष्पमाला?

तििमर भावरङ्ग पुसाया अन्तरी रिघाला. 이 चमकुनी परोपरी सोनसळी जादूकरी क्रूर वञ्चनॆत परन्तू अन्ति लोटण्याला.” (नदी ९५) ध्रुवपद जातिस्वरूप, कडव्याचे पहिले तीन चरण छन्दःस्वरूप म्हणजे लगभेदातीत, आणि चौथा चरण पुन्हा जातिस्वरूप हें मिश्रण घोटाळा श्रुत्पन्न करणारें असल्याने अिष्ट नाही. 'येसि कधी घेभुनि? मधील क लघु झुचारायचा आणि 'सोनसळी जादू करी' मधील क गुरु झुचारायचा ही विसङ्गति ओकाच कवितेंत अिष्ट नाही. शुद्ध छन्द वा शुद्ध जाति यांच्या रचनेंत कवीला विविधता आणि मोकळीक हीं हवींत तितकी मिळू शकतात.