पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने
१३
काही छन्दोविषयक प्रश्न
१२ अपठनीय पद्य म्हणजे विकृत गद्य होय.
ओखादे पद्य थोडेसें गळ्यावर म्हणण्याचा प्रयत्न करूनहि त्याला चाल लागली नाही तर तें म्हणावेसेंच वाटत नाही; आणि तें गुणगुणावेसेंच वाटलें नाही तर प्रायः त्या प्रकारची काव्यरचना पुन्हा होत नाही. संस्कृत छन्दःशास्त्रांतील कित्येक वृत्तांचीं झुदाहरणें सुप्रसिद्ध कवींच्या कृतींत आढळत नाहीत अथवा अत्यन्त वैरल्याने आढळतात याचें मुख्य कारण हेंच की त्यांना ओखादी मधुर चाल सहज नि सरळ लागू शकत नाही. झळझळीत गद्य गद्याप्रमाणे वाचतांना काही वाटत नाही पण दिखाञ्भू पद्य गद्याप्रमाणें वाचायची पाळी आली की तें असह्य हेोतें. वाटेल त्या वृत्तांत, मग तें कितीहि क्रुिष्ट नि विचित्र असो, पद्यरचना करून लोकांना चकित करावयाचेंच अशा प्रतिज्ञेने कष्टणा-या काव्यकोल्हाट्यावाचून कोणी कृिष्ट आणि चमत्कारिक वृत्तांत रचना करण्याचा भयड्कर खटाटोप करणार नाही. १३ रचनाशैथिल्याची अिष्टानिष्टता हदग्यांच्या गाण्यांसारखीं परम्पराप्राप्त अशीं जीं लोकगीतें आहेत त्यांची रचना अतिशय शिथिल आहे. परन्तु त्यांच्या चाली परम्परेने जिवन्त ठेवल्यामुले रचनेचें शैथिल्य हें वाच्य कवितेला जसे घातक होतें तसें तें या परम्पराप्राप्त गीतांना होॠ शकत नाही. त्यांतून, त्यांचा सम्बन्ध हा अजाण वयाशी वा अशिक्षित वर्गाशी येत असल्यामुळे हें शैथिल्य वैरस्यकारक होत नाही. ही शिथिलरचना असंस्कृत लोकांच्या हातून वा छन्दःशास्त्राच्या पूर्वीच्या आधुनिक पद्यांत हें शैथिल्य आढळतें; आणि तेथे बाळबोलांतील बोबडेपणाअितकेंच तें हृदयङ्गम वाटतें, पहा. ओक होता मुलगा मुसळ झालें खूश त्याला सापडला हुलगा त्याला भेटली घूस हुलग्याची केली उसळ घुशीने केलें बीळ जेवायला आलें मुसळ R त्यांत साठविले तीळ R