Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना RR शकत असला तरी सामान्यतः चाल लावतांना, कवीचें पद्य सरळ वाचीत गेल्याने जो लय, जे तेोल, जो ताल प्रतीत होतो, जो केवळ अक्षरानुसारी असतो तोच घ्यावयाचा असतो. या अक्षरानुसारी तालांत पद्य लगक्रमाप्रमाणे सरळ थोडेसें गळ्यावर म्हणत गेलें असतां जी चाल, जी स्वररचना आपोआप लयबद्ध आणि श्रुतिसुखद वाटते ती काव्यास अनुकूल, आणि रसास्वादास प्रसिद्ध वृत्तांच्या चाली परम्परेने आल्या आहेत. त्या कानावर पडून पडून सहज अवगत होतात. त्या बळेच प्रयत्नाने बसवाव्या लागत नाहीत. तेव्हा ओखाद्या अपरिचित पद्यप्रकारास चाल लावायची झाली तर ती साधी नि सुलभ लावावी. ती अमुकच ओक असली पाहिजे असें नाही. पण दोनचारदा कानावर पडली असतां ती अवगत व्हावी, तिचें सहज अनुकरण करितां यावें अितकी ती साधी नि सुलभ असावी. अर्थावरून लक्ष्य झुडून तें स्वरलालित्यांत गुरफटेल अशी चाल काव्याला अगदी कामाची नाही. ११ पद्यप्रकार रूढ कसा होती ? ओखाद्या पद्यप्रकारांत ओखादी चटकदार कविता रचण्यांत आलेली दिसली आणि त्यांतून त्या कवितेला चित्ताकर्षक चाल लाविलेली औकण्यांत आली की ताबडतोब अनुकरण व्हायला लागून तो पद्यप्रकार कविमान्य आणि रूढ होती. ' श्रुद्धवा, शान्तवन कर जा ? हें प्राचीन पद सुप्रसिद्ध असलें तरी आधुनिक मराठी कवितेंत या शुद्धवजातीची टूम ही गोविन्दाग्रजकृत 'राजहंस माझा निजला ' याच कवितेने पाडली. मुद्रिका ही जाति ताम्बेकृत ‘ तू हुबेहूब साक्षुली त्याच मूर्तिची’ या कवितेमुळे कविप्रिय झाली; आणि 'मुद्रिके, राम टाकुनी अलिस तू कशी? या मूळ पद्याचें पहिलें कडवेंहि ज्यांना पुरतें ठाक्षूक नव्हतें असे कवि ' तू हुबेहूब साक्षुलीच्या चालीवर कविता रचून शिरोभागीं 'चाल, मुद्रिके राम टाकुनी० या पदाची' अशी सूचना देशृं लागले! काहीतरी कारणाने कवीला ओखाद्या कवितेच्या चालीची चटक लागावी लागते म्हणजे मग ते त्या धाटणीच्या कविता राचितो. यामुळेच तर छन्दःशास्त्रांत वृतें