Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/369

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ՅՅՀ स्मरुनि गुरुपदा शपथचि घेतों, कधि न टळे कोदण्ड अचल.” (देशा २४) या पद्यांत पादाकुलकाच्या दोन चरणांना [। प । प । प।- ० - ७ ] या मात्रावलीचा ओक चरण जोडून कडवें सिद्ध केलेलें आहे. वरवर पाहतां कडव्याची घटना भिन्न दिसते म्हणून जाति भिन्न मानावयाची काय? हेंच कडवें

  • जरि न घडे हैं। नलगे भायी, स्वदेह वाहन हा जनकार्या, स्मरुनि गुरुपदा शपथचि घेतों कधि न टळे कोदण्ड अचल.” असें लिहिलें तर, वा मागील कडवें

‘ मेघ वर्षोंतल, शेतें पिकतिल, गर्वाने या नद्या वाहतिल, कुणा काळजी की न झुमटतिल पुन्हा तटावर हेच पाय ?” असें लिहिलें तर दोन्ही पद्यांची जाति ओकच आहे असें स्पष्ट दिसून येतें. तेव्हा दोन जाति मानणें चुकीचें होअील. म्हणून जेथे जेथे कडव्याचा अन्त्य चरण हा झुपान्त्य चरणाला जोडून घेतां येऊन त्यांची रूढ अशी मात्रावली सिद्ध होत असेल तेथे तेथे तो जेोडून घेथून नन्तरच कडव्याची होणारी घटना ध्यानांत घेञ्थून जातिनिर्णय करावा. यमकाला चरणनिर्णयांत प्राधान्य देण्याचें कारण नाही. या पद्धतीने चालल्यास मागे ३३७ व्या पृष्ठावर दिलेल्या पद्याचें कडवें

  • हे मधुप फुलांभोंवती

डोलती जसे गुञ्जती लोभले तेवि सोबती, तयांचा ओघ न कधि आटला. ”(यभा ४८) असें होङ्क्षून त्या पद्याची आणि نl۰ س

  • तारका चमकली नभीं तेजाची पुतळी झुभी, रिपु तिमिर तयाला न भी;

झुत्साह वाढता तिचा अहाहा परिसर झुज्ज्वल करी! ” (त ७७)