पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने काही छन्दोविषयक प्रश्न ܐܘ रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ' या रामनामाचीं विभक्तिरूपें साड्गणा-या सुप्रसिद्ध श्लोकापेक्षा निराळ्या चालीवर म्हणण्यांत येतो, पण वस्तुतः दोन्ही श्लेीक शार्दूलविक्रीडित नावाच्या ओकाच वृत्तांतील आहेत. फार कशाला, ज्या श्लोकाचे चारी चरण अगदी सारखे असतात त्या श्लोकांतहि दुसरा चरण पहिल्या चरणाहून किचित् निराळ्या रीतीने म्हटला जातो.' भूपाळी, लावणी या चाली आहेत, या भिन्नभिन्न जाती नव्हत. *घनश्याम सुन्दरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही होनाजी बाळाची सुप्रसिद्ध भूपाळी लावणीसारखी म्हणतां येअील, तर झुलटपक्षीं प्रभाकराची 'कधि गा भेटशिल अता जिवाचे जिवलग मैतरणी' ही लावणी थेट भूपाळीसारखी म्हणतां थेअील. अांतील विपयाला अनुकूल अशी चाल पद्याला लाविल्याने पद्याच्या सरसतेंत भर पडते. वैचित्र्याच्या रसपरिपोषक सूक्ष्म छटा या श्रुतिसिद्ध कवीच्या रचनेंत जशा येोंधूं शकतात तशा त्या धोपटमार्गी कवीच्या रचनेंत येॠ शकत नाहीत. ८ काव्यपठन आणि गायन छन्दाला चाल लागत असली तरी छन्द वा काव्य म्हणजे सड्गीत नव्हे. छन्द म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय. ही अक्षरशः पहातां अष्टमात्रक, ससमात्रक, षण्मात्रक, पङ्खमात्रक आणि चतुर्मात्रक अशा आवर्तनाची असते. परन्तु गायकी तालांची सङ्ख्या पाचच आहे असें नाही. अक्षरशः पहातां भिन्न तालांत बसणारें पद्य गवअी मात्रा जुळवून घेथून निराळ्याच तालांत १ पहिल्या व तिस-या चरणांचा न्यास बहुतेक वृत्तांत ऋषभ स्वरावर होतो तर दुस-या व चौथ्या चरणांचा न्यास षड्जावर होतो. झुदाहरणार्थ, अिन्द्रवज्रा म्हणतांना पहिल्या चरणांत सा सा रे ग म प म ग रे सा रे असा स्वरक्रम असती तर दुस-या चरणांत गा ग रे सा नि नि रे ग रे सा सा असा स्वरक्रम होतो: पण छन्दोदृष्टया दोन्ही चरण अभिन्नच असतात. झुलटपक्षीं स्वागता आणि रथोद्धता ही वृतें भिन्न भिन्न आहेत तथापि त्यांचें स्वरलेखन ओकच आहे. प्रो. ग. ह. रानडे यांचा लेख पहा. (भारतीय सङ्गीत ३/२)
पान:छन्दोरचना.djvu/36
Appearance