Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RV98 वृत्तविस्तार परिच्छेद ३ रा अग्न्यावर्तनी वृत्तें सप्तमात्रक गणाला अमि हैं नांव दिलें आहे; कारण अमि हा सताजह्व असती असें म्हणतात. (७ ---), (--- ७ ) (-- ७ -) आणि (-७ --) असे या अग्रिगणाचे चार मुख्य प्रकार आहेत. ओका गुरूच्या ठिकाणीं दोन लघु घालून अनेक झुपप्रकार साधितां येतील. (७-७७-) आणि(Sunitabarve (चर्चा)-) हे दोन झुपप्रकार (७ ---) आणि (-- ७ -) या दोन प्रकारांतच समाविष्ट होतात. या गणांच्या पुनरुत्तीने हीं अग्न्यावर्तनी वृतें सिद्ध होतात. यांच्यापैकी काही थोडीं, झुर्दू कवितेच्या परिचयामुळे सङ्गीत नाटकांतून आली असली तरी बहुतेक, अरबीफार्सी छन्दःशास्त्राच्या अभ्यासानन्तर प्रस्तुत लेखकाने केलेल्या सहेतुक प्रयत्नानेच शुद्ध स्वरूपांत मराठींत आणण्यांत आलीं आहेत. अशा अरबी-फार्सी छन्दःशास्त्रांतून घेतलेल्या वृत्तांच्या नावांपुढे * फुली दिलेली आहे. विबुधप्रिया, मानसहंस आणि *सुरनिम्नगा”हीं वृतें मात्र संस्कृतांतून मराठींत प्राचीन काळापासून आलेलीं दिसतात. टाळी नेहमी पहिल्याच अक्षरावर पडते असें नाही. परन्तु पहिल्या गणांत ती जितव्या अक्षरावर पडेल तितव्याच अक्षरावरती ती पुढील गणांत पडली पाहिजे. अन्त्यगणांत टाळी ज्या अक्षरावर पडते त्याच्या पुढील अक्षरें नसलीं तरी चालतें, तितक्या निःशब्द मात्रांचा तेथे विराम होतो. आरम्भापासून गणना करितां ज्या गणाच्या पुनरुत्तीने वृत्त सिध्द झालें आहे असें वाटतें त्या गणान्तीं झुभी रेघ दिली आहे. प्रत्येक गणान्तीं यति असतोच म्हणजे तेथे पदसमाप्ति झालीच पाहिजे असें नाही. आवर्तन सप्तमात्रकच असलें तरी गणनारम्भ ज्या अक्षरापासून धरावा त्याप्रमाणे पुनरुत गणाचें स्वरूप पालटतें, आणि यतिस्थानहि पालटू शकते. -c2|IT 34&fٹی] بع آIIR-dik?[-۔ ں -- س - l --ں ----- !---ں ------- ں ----- l] रान्तीं यति असावा असें वाटतें पण याच लगावलीची मोडणी [-। - ७ - - । - ७ -- !- ७ - - । - ७ - ] अशी घेतली की यति नवव्या अक्षरा