Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दारचना Q3 ओकाक्षरी वृत्तापासून सव्वीस-अक्षरी वृत्तापर्यन्त अनुक्रमें ( १) क्षुक्ता, (२) अल्युक्ता, (३) मध्या, (४) प्रतिष्ठा, (4) सुप्रतिष्ठा, ( R ) गायत्री, (७) क्षुष्णिह्, (८) अनुष्टुभ्, (९) बृहती, ( १० ) पङ्क्ति, ( ११ ) त्रिष्टुभ, (१२) जगती, (१३) अतिजगती, (१४) शाकरी, ( १५) अतिशष्करी, (१६) अटि, ( १७) अत्यष्टि, (१८) धृति, (१९) अतिधृति, (२०) कृति, (२१) प्रकृति, (२२) आकृति, (२३) विकृति, (२४) सङ्कृति, (२५) अभिकृति, आणि (२६) श्रुत्कृति या नावाचे वर्ग कल्पिण्यांत आले आहेत. ज्या वृत्तांच्या चरणांत सव्वीसाहून अधिक अक्षरें आहेत त्यांना दण्डक वा मालावृत्त' म्हणतात. दण्डकांत ओका विशिष्ट गणाची सारखी आवृत्ति असते तशी माला वृत्तांत नसते. वृत्त फारच आखूड असल्यास अर्थप्रतिपादनाची अंडचण होते; आणि म्हणूनच प्रीति, विदग्धक, हारीत, तनुमध्या, कुमारललिता, आनन्द, हंसमाला अित्यादि वृत्तांच्या द्विरावृत्तीने अनुक्रमें पद्मिनी, मरालिका, स्वानन्दसम्राट्, मणिमाला, राजरमणीय, आनन्दकन्द, दया अित्यादि नवीन वृतें साधण्यांत आलीं असतील. सहासात-अक्षरी वृत्तांविषयी क्षेमेन्द्र मार्मिकपणाने म्हणतो,

  • न पट्सप्ताक्षरे वृत्ते विश्राम्यति सरस्वती

भृङ्गीव मछिकाबालकलिकाकोटिसङ्कटे' (क्षेसु २।२) वृत्त अतिशय दीर्घ असल्यास कवि आणि वाचक दोघांचाहि अधूर भरून यावयाचा ! पद्यपाटव दाखवून वाचकांना चकित करून टाकण्यासाठी अति-हस्व वा अतिदीर्घ वृत्तांत जरी रचना करून दाखविण्यांत आली असली तरी अशों कृिष्टवृत्तें हीं रमणीयार्थाच्या स्वाभाविक प्रतिपादनाला निरुपयोगीच होत. भास, वराहमिहिर, वाग्भट, भवभूति अित्यादिकांच्या कृतींत दण्डकरचना आढळते यावरून दण्डकाचें प्राचीन महत्व दिसून येतें. वराहमिहिराच्या ओका दण्डकाच्या (वबू १०३॥६१) प्रत्येक चरणांत १०२ अक्षरें आहेत. सिद्धर्षिकृत श्रुष्पमितिभवप्रपञ्खाकथामध्ये दण्डकाच्या चतुष्पद्या नाहीत; तर ओकओक दोनदोन स्फुट चरण आहेत. या ग्रन्थाच्या ५ व्या प्रस्तावांतील (पृ. ८४१ १ भरत आणि केदारभट्ट हे अभिकृतीच्या ठिकाणीं अतिकृति म्हणतात. २ मालावृत्त (भ १५४७).