पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ९३ वृत्तविचार चरणांत ओकोणतीस २९ लघू असून मग (-७) हा गण असतो. खङ्गामध्ये दोन्ही चरणांत छत्तीस ३६ लघू असून मग रगण असतो. (प्रापै १/१६१,१५८). चूलिकेचा जो दुसरा प्रकार हलायुध साड्गतो त्यालाच केदारभट्ट अतिरुचिरा (के २/४२) म्हणतेो. या प्रकारांत [२७ ल ॥ १ ग] दोन्ही चरण सारखे असून ते सत्तावीस लघु आणि ओक गुरु मिळून झालेले असतात. सोळा लघूनन्तर चरण तोडून या द्विपदीची जर चतुष्पदी केली तर तें अर्धसम वृत्त होअील. ज्या पद्यांत विषम वा ओज वा अयुकू म्हणजे पहिला ने तिसरा हे चरण सारखे असतात; आणि सम वा अनोज वा युकू म्हणजे दुसरा नि चौथा हे चरण सारखे असतात तें अर्धसम वृत्त होय. समवृत्तांच्या सङ्ख्येच्या मानाने अर्धसम वृतें अगदीच अल्पसङ्ख्य आहेत. अर्धसम वृत्ताचा आणखी ओक प्रकार आढळतो; पण त्या प्रकाराचें पृथकू विवेचन कोणी केलेलें नाही. या प्रकारांत चतुष्पदीचे पहिले दोन चरण सारखे ओका लगावलीचे असतात; आणि शेवटील दोन चरण सारखे, पण भिन्न लगावलीचे असतात. या प्रकारच्या मिश्रणाचे स्फुट श्लोक आढळतात, ते पुढे वृत्तविहारांत दिले आहेत. परन्तु ओकासारखे अनेक श्लोक आढळल्याविना त्या प्रकाराला पृथकू स्थान प्राप्त होोंधूं शकत नाही. अचलधृति आणि विद्युन्माला यांच्या अशा मिश्रणाने होणा-या प्रकारांचा (पि ४/५०-५१, मागे पृष्ठ २३ पहा) पिङ्गल झुछेख करितो; परन्तु हलायुधाने दिलेल्या झुदाहरणाव्यतिरिक्त अितरत्र तशी रचना संस्कृतांत मला आढळली नाही. मराठींत मात्र मोरोपन्ताने आपलें सौम्य रामायण (मोसग्र ८/१३८ ) हें सौम्या नामक अर्धसम वृत्तांत रांचलें आहे. चतुष्पदीचा पूर्वार्ध विद्युन्माला आणि झुत्तरार्ध अचलधृति असल्यास त्या अर्धसम वृत्ताला सौम्या (पि ४/५१) वा अनङ्गक्रीडा (के २/४१ ) म्हणतात. चारी चरण ओकसारखे असले म्हणजे त्या वृत्ताला समवृत्त म्हणतात. समवृत्तांचें वर्गीकरण चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे करण्याचा आम्नाय आहे.
पान:छन्दोरचना.djvu/120
Appearance