Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ९१ वृत्तविचार हीं तीन वृतें अक्षरसङ्ख्येने आणि लगक्रमाने ओकसारखीं असल्याने न, न, न, न, स, याच क्रमाने तिन्ही वृत्तांचे पिङ्गलोक्त गण पडतात; पण या तीन वृत्तांत अनुक्रमें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षण्मात्रक आवर्तनें असल्याकारणाने त्यांची गणविभागणी निरनिराळी होते. आवर्तन किती मात्रांचें आहे, आवर्तनारम्भ कितव्या अक्षरावर होतो, आणि गण-विभागणी कशी होते यांचा निर्णय करायला प्राचीन छन्दःशास्त्रकारांनी साङ्गितलेल्या यतिस्थानांचा फार श्रुपयोग होतो. म्हणून लक्षण साङ्गतांना यात कोठे आहे हैं साड्गण्यांत येतें; आणि यतिभेदाने म्हणजेच मोडणी-भेदाने वृत्तभेद मानण्यांत येतो. वर दिलेल्या वृत्तांत यतिस्थानें खाली टिम्ब असलेल्या झुभ्यारेघांनी दाखविण्यांत आलीं आहेत. यति अनुक्रमें ८ व्या, ७ व्या आणि ६ व्या अक्षरानन्तर साङ्गितले आहेत त्यावरून आवर्तनें हीं अनुक्रमें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षण्मात्रक आहेत ही गोष्ट कळते. परन्तु पुष्कळदा यति साङ्गितलेलेच नसतात वा भलत्याच म्हणजे अस्वाभाविक ठिकाणीं साङ्गितलेले असतात. झुदाहरणावरून वृत्ताची मोडणी निष्णींत करूं म्हटलें तर ओखार्देच झुदाहरण असायचें आणि तेंहि छन्दःशास्त्रकारानें रचून घातलेलें असायचें. वृत्तव्याख्या सुधारायला त्या झुदाहरणाचा फारसा झुपयोग होत नाही. म्हणून ओखाद्या वृत्ताच्या जर अनेक मोडण्या सम्भवत असतील तर त्या सा-या देण्याचा प्रयत्न मी या ग्रन्थांत केला आहे. तथापि जेथे चरणांत ओखाद्या विशिष्ट गणाची आवृत्ति आहे तेथे, जेणें करून ती आवृत्ति भड्गेल अशी मोडणी घेणें झुचित नाही. चारी चरण भिन्न भिन्न लक्षणांनी युक्त असल्यास त्या वृत्तास विषम वृत्त म्हणतात. संस्कृतांत अनेक विषम वृतें साङ्गितलीं आहेत. त्यांपैकी ओकाच विषम वृत्ताचा झुपयोग सलग दीर्घ रचनेंत केलेला आढळतो. सौन्दरनन्द ३ रा, किरात १२ वा आणि शिशु १५ वा हे सर्ग झुद्रता नामक विषमवृत्तांत आहेत. या वृत्ताचें लक्षण झुत्पल (वबू १०३/४८) या श्लोकावरील टीकेंत ‘ प्रथमे सजौ यदि सलौच नसजगुरुकाण्यनन्तरम् यद्यथ भनजलगाः स्युरयो सजसा जगौच भवतीयमुद्रता”