Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने अध्याय ३ रा वृत्तविचार आणि वृत्तविस्तार शिखा,' खज्ञा नि चूलिका हे प्रकार वगळल्यास संस्कृतांत पद्याचें परिमाण चतुष्पदी हें आहे. शिखा, खज्ञा नि चूलिका या प्रकारांत चरण दोन दोनच असले तरी ते दीर्घ असल्याने म्हणतांना त्यांचे स्वाभाविकपणेंच चारचार चरण होतात. संस्कृतांत बहुशः अनुष्टुप् छन्दांतील चतुष्पदीसच श्लोक म्हणतात; तथापि शङ्कराचार्यकृत * प्रातःस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम्? या ‘प्रातःस्मरण’ स्तोत्रांत वसन्ततिलकावृत्ताच्या तीन चतुष्पद्या असून त्यांना झुद्देशून न्मन्तर

    • श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभूषणम् ।

प्रातःकाले पठेद्यस्तु स गच्छेत्परमं पदम् ॥ ” असा श्लोक आहे. मराठींत कोणत्याहि वृत्तांतील चतुष्पदीस इलोक म्हणतात. ज्या पद्यांतील चरण विशिष्ट अक्षरसङ्ख्या, लगक्रम आणि मोडणी वा गणविभागणी यांनी नियमित असतात तें वृत्त होय. मोडणी म्हणजे पिङ्गलोक्त गणांचा क्रम नव्हे तर अन्तर्गत आन्दोलनानुसार होणारी गणविभागणी होय. अक्षरसङ्ख्या आणि लगक्रम हीं अभिन्न असलीं म्हणजे आरम्भापासून गणना करून चरणाचे जे त्र्यक्षरी तुकडे वा गण पडतात ते पिङ्गलोक्त गण ओका ठराविक क्रमानेच येतात. पण पिङ्गलोक्त गणांचा क्रम अभिन्न असू नहि अन्तर्गत आन्दोलनानुसार होणारी गण-विभागणी भिन्न भिन्न होअँ शकते. या गणविभागणीस मोडणी म्हटलें आहे. )पि ७/१३(] - ܟ ܟ ܝ ܚ ܝ ܚ ! ܝ ܚ ܝ ܚ ܝ ܚ ܝ ܚ ܐ ] ܪ̈ܕ̄Hforg9Ifqܵ )।-](हे २/२४४ • • • • • • • ! ܝ ܢ ܝ ܟ ܚ ܝ ܚ ܐ ] Tܗܪ̈IRI؟ रंटक ] ! ܝ ܚ ܝ ܚ ܝ ܚ ! ܢ ܢܝ ܝ ܚ ܢ ܝ ! ७ ७ -](हे २/२४५) sa १ शिखा नि खज्ञा हे प्रकार वृत्तरत्नाकर आणि प्राकृत पैङ्गल या दोनच ग्रन्थांत पादद्वयघटित आहेत.