Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने ७०

  • । णचअि चंचल । बिज्जुलेिआ साह । जाऽणश्रे

। मम्मह खग्ग कि- । णीसअि जलहर । साऽणओ | फुल कअंबअ । अंबर डंबर | दीऽसअॅ । पाश्रुस पाश्रुघ- णाघण सुमुहि व-॥रीऽसअॅ'(प्रापै १। १८८) शंकर आणि अितःपर यांचे झुचार शङ्-क-र आणि अि-तहू-प-र असे होत असल्याने अनुस्वार आणि विसर्ग यांच्यामुळे अक्षर व्यञ्जनान्त म्हणजे संवृत म्हणजे गुरु होतें हें झुघड आहे. 'संवय' सारख्या शब्दांत शीर्षबिन्दु हा अनु स्वार व्यक्त करीत नाही, केवळ नाकांतून झुचार करायचा हें व्यक्त करितो. तेथे शीर्षबिन्दूने गुरुत्व येत नाही. महत्व झुचाराला आहे, लेखाला नाही हें ध्यानांत वागविलें पाहिजे ऋल संयुक्त अक्षरांचा विचार केल्यानन्तर यांचा िवचार करूं संयुक्तवर्णपूर्व अक्षर संयोग -हस्वास गुरुत्व देतो' हा नियम केवळ लेखाकडे लक्ष्य देथून केलेला आहे. काही जोडाक्षरापूर्वील लघूस गुरुत्व येत नाही हें जेव्हा आढळून आलें तेव्हा आघात असल्यासच गुरुत्व येतें अशी या नियमाला पुस्ती जोडण्यांत आली झुचारदृष्ट्या अक्षरघटना कशी होते हें पाहिलें असतें तर साराच घोटाळा दूर झाला असता. शब्दाची सारी अक्षरें आपण सलग आणि लागोपाठ झुचरितो त्यामुळे शब्दांत कोठे दोन वा अधिक व्यञ्जनें संयुक्त असली तर त्यांतील पहिलें व्यञ्जन तत्पूर्वील अक्षरांत समाविष्ट होतें. विप्र या शब्दाचीं लेखन-दृष्टया वि आणि प्र अशी दोन अक्षरें दिसतात; परन्तु झुच्चारदृष्टया विप्-र अशी दोन अक्षरें पडतात. सूक्ष्मपणाने पाहिलें तर असे दिसतें की प्चा झुच्चार प्रथमाक्षरान्तीं सम्पून मग तो द्वितीय अक्षराच्या आरम्भ येतच नाही असें नाही. झुचार काटेकोरपणाने लिहून दाखवायचा तर तो विप्-प्र असाच लिहिला पाहिजे पण तें असो. मुख्य गोष्ट ही की महत्त्व लेखापेक्षां झुचाराला आहे छन्दसा लक्षणं येन श्रुतमात्रेण बुध्यते' असें श्रुतबोधाच्या आरम्भींच साङ्गितलें आहे. शब्दांत कोठे संयुक्त व्यञ्जनोच्चार असला तर त्यांतील पहिला