Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ६७ यमक, यति, अक्षर आणि गण अगदी सूक्ष्मपणाने विचार केला तर असे वाटतें की रुचिरा आणि प्रहर्षेिणी या वृत्तांत, पाहिल्या आवर्तनांत ज्याप्रमाणे द्विमात्रक विराम असल्याने अनुक्रमें चौथ्या आणि तिस-या अक्षरानन्तर यति साङ्गण्यांत आला आहे त्याप्रमाणे दुस-या आवर्तनांतहि पाचव्या अक्षरानन्तर यति साङ्गायला हवा. म्हणजे रुचिरा आणि प्रहर्षिणी यांची अक्षरमाण्डणी आवर्तनानुसार अनुक्रमें [। – – ऽऽ ! ] आणि [ ऽऽऽ ! ७ ७ ७ ७ - ऽऽऽ ! ७ - ७ अशी हो औील. यतिस्थान (!) या चिन्हाने दाखविलें आहे ३ अक्षरविचार अक्षर म्हणजे वर्ण नव्हे, आणि अक्षरविचार म्हणजे शुभ वर्ण कोणते आणि अशुभ वर्ण कोणते याचाहेि विचार नव्ह. वणीचे शुभ आणि अशुभ वा दग्ध असें वर्गीकरण केलेलें आढळतें तें कोणत्या तत्वास अनुसरून आहे आणि त्या वर्गीकरणाचा छन्दःशास्त्राशी काय सम्बन्ध आहे हें काही समजत नाही. काव्यारम्भीं अशुभ अक्षर नसाव; पण देवाच्या नावासारख्या मङ्गल शब्दारम्भ तें असलें अथवा तें गुरु असलें तर म्हणे दोषाचा परिहार होतो ! अक्षर म्हणजे ओकावेळीं तोण्डांतून बाहेर पडणारा ध्वनि होय, मग तो ध्वनि लिहून दाखवायला लिपीतील चिन्ह अॅक लागो वा अनेक लागोत अक्षराचे अधिष्ठान स्वरावर असतें, मग त्यांत आरम्भीं वा अन्तीं व्यञ्जनोच्चार मिळो वा न मिळो. राजन् या शब्दाच्या लेखाकडे पाहून आपण यांत रा-ज-न् अशीं तीन अक्षरें आहेत म्हणून म्हणता; पण हें चूक आहे. वस्तुतः रा-जन् अशीं दोनच अक्षरें अहेत. शब्दांत जितके स्वर तितकीच अक्षरें होणार. रा हें अक्षर आकारान्त म्हणजे स्वरान्त आहे; तर जन् हें अक्षर व्यञ्जनान्त आहे स्वरान्त अक्षराला विवृत म्हणतात आणि व्यञ्जनान्त अक्षराला संवृत म्हणतात. स्वराच्या हस्वदीर्घतेप्रमाणे स्वाभाविकपणेंच विवृत अक्षर झुच्चारायला न्यूनाधिक काळ लागतो. दीर्घ स्वर झुचारायला लागणारा काळ हस्व स्वर झुचारायला लागणा-या काळाच्या दुप्पट गणावा असा स्थूल सङ्केत आहे . १ “अॅक मात्रं भवेद् -हस्वं द्विमात्रं दीर्घमिष्यते प्लुतं चैव त्रिमात्रं स्याद् अक्षरं स्वरयोजनातू ” (भ १७॥११६ )