पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ६५ यमक, यति, अक्षर आणि गण यतिस्थानीं विराम घ्यावयाचा तो न्यूनाधिक असू शकतो. त्या ठिकाणीं जर नुसता खटकाच असेल तर तो स्वल्पविराम समजावा. रुचिरा आणि प्रहर्षिणी या वृत्तांत अनुक्रमें चार आणि तीन अक्षरांनन्तर म्हणजे सहा मात्रां नन्तर द्विमत्त्रक विराम असावा असें मला वाटतें. पिङगलाची धरसोड आवर्तनी वृत्तांत यतिस्थान कोणत मानावें याविषयी पिङ्गलाचे काही निश्चित धोरण दिसत नाही. कुड्मलदन्ती, जलोद्धतगति, प्रहरणकलिता पणिगुणनिकर, ललना अित्यादि सोळा मात्रांच्या पद्मावर्तनी वृत्तांत तो प्रथमावर्तनान्तीं यति साङ्गतो; परन्तु दोधक आणि मत्ता या सोळाच मात्रांच्या पद्मावर्तनी वृत्तात ता तसा प्रथम आवर्तनाच्या अन्तीं यति साङ्गत नाही. रुक्मवती वृत्तांत तर चरणमध्यावर चरणाचे लगम्रक्रमदृष्टया अॅकसारखे असे दोन तुकडे पडत असूनहि तो यति साङ्गत नाही; आणि वरतनु (म्हण जेच मालती) वृत्तांत तर तो भलत्याच ठिकाणीं यति साङ्गतो. क्रौञ्चपदावृत्तांत तो प्रत्येक आवर्तनान्तीं यति साङ्गतो, पण त्या सारख्याच तन्वीवृत्तांत तो पहिल्या आणि दुस-या आवर्तनान्तीं यति साङ्गतो, पण तिस-या आवर्तनान्तीं साङ्गत नाही पिङ्गलाची ही धरसोड दाखवून देण्याचा हेतु अितकाच की त्याचे मत हें अवश्य विचारणीय असलें तरी तो अन्तिम निर्णय समजण्यांत ये नये. अमुक ओक ठिकाणीं यति मानावा की नाही याचा निर्णय, प्राचीन विपुल झुदाहरण झुपलब्ध असतीं तर तत्काळ देतां आला असता. परन्तु हें आता शक्य नाही पिङ्गलाचे मत प्रमाण मानून ज्या कवींनी त्याप्रमाणे रचना केली त्यांच्या रचनेचा झुपयोग पिङ्गलाच्या मताची ग्राह्याग्राह्यता ठरवायला मुळीच होणार नाही. कवींनी यति पाळलेला दिसला नाही तरी मोडणी पहातां जेथे अॅक वा अनेक मात्रांचा विराम असेल तेथे यति मानल्यावाचून शास्राला गत्यन्तर नाही. कित्येक अशीं वृत्तें आहेत की त्यांच्यांत प्रथमावर्तनांत शेवटीं द्विमात्रक विराम पाहिजे असे मला वाटतें. नवमालिनी, प्रमदा, कुटिल, गजविलसित, प्रभद्रक, कुमारी, मणिकल्पलता,
पान:छन्दोरचना.djvu/९२
Appearance