Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने पण या अेवढ्या व्यापारापासून प्राप्ति काय असा प्रश्न करणारे केव्हा केव्हा भेटतातच त्यांना काय समजावून साङ्गावयाचें ? बुभुक्षितैः व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते नच्छन्दसा केनचिदुदृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फलाः क्रिया या सुभाषिताचा अर्थ मलाहि कळतो. पण छन्दाला मोल नाही, गत्यन्तरहि नाही. अितक्या वर्षांच्या सहवासानन्तर अशी, हातावेगळी झाली तरी हृदयांत घर करून रहाणारी गोष्ट अितर जाणत्यांनाहि आवडली, मान्य झाली म्हणजे जें समाधान होऔील तेंच सा-या श्रमांचें सार्थक होय ता. २३ जानेवारी १९३७ अिसवी. डेक्कन जिम्खाना, पुणे ४ माधवराव पटवर्धन