Jump to content

पान:छन्दोरचना.djvu/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४० वरती आले राविकिरणांमधि अहा चमकले खोल पळाले धडधडलें ना गे मम हृदयीं ? अशी निर्दये, केवि मुग्धता ? बोल बोल गे काय वाटलें खुलास हृद माग गडे गे ' यक्षकन्या (वागीश्वरी पृ ६२) या सतरा चरणांच्या कडव्यांत अध्यहून अधिक म्हणजे आठ चरण पादाकुलकाचे आहेत. पाच चरण अष्टमात्रक आहेत. अॅकच चरण आणि तो शेवटला चोवीस मात्रांचा आहे. अॅक चरण आणि तो पहिलाच सहा मात्रांचा असून त्याच्या अन्तीं द्विमात्रक विराम आहे. * अन् तू मी दोघे' हा चरण दहा मात्रांचा आणि 'जणु जलाशयामधि सुन्दर मासे' हा चरण अठर मात्रांचा आहे. या दोनच चरणांच्या आरम्भीं दोनदोन मात्रांचा आद्यतालकपूर्व गण असून त्यांच्या पूर्वीच्या चरणान्तीं आवर्तन पूर्ण होत असल्याने या दोन्ही ठिकाणीं लयभङ्ग म्हणजे छन्दोभङ्ग होतो. तेव्हा ज्याला 'बेबन्द’ म्हणून त्याचे ‘प्रणेते' म्हणतात तो पद्यप्रकार जाति बद्ध असून त्यांत सोळा मात्रांचे आणि आठ मात्रांचे असे निर्यमक चरण स्वैरपणाने जुळलेले आहेत. परन्तु ही चराविभागणी कोणत्याहि तत्त्वाला अनु सरून केलेली नसल्याने या लेखाणाचे चरण आधिक ‘बेबन्द'पणे निराळ्या रीतीने पाडून दाखविणे कठिण नाही; आणि ती नवी चरणरचना अधिक स्वाभाविक आहे असा आग्रहहि धरितां येओील ! रा. आत्माराम रावजी देशपाण्डे यांनी खिस्तशके १९२४ च्या जुलैमासीं जें काव्य ओका नव्याच छन्दांत रचायला आरम्भ केला त्यांतील अॅका परिच्छेदाचें पृथक्करण करून पाहूं. आवर्तन सप्तमात्रक [ या काव्यात ] अशा गणाचें