पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने काही छन्दोविषयक प्रश्न रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर' या रामनामाचीं । विभाक्तिरूपें साङ्गणा-या सुप्रसिद्ध श्लोकापेक्षा निराळ्या चालीवर म्हणण्यांत येतो, पण वस्तुतः दोन्ही लोक शार्दूलविक्रीडित नावाच्या अॅकाच वृत्तांतील आहेत. फार कशाला, ज्या श्लोकाचे चारी चरण अगदी सारखे असतात त्या श्लोकांतहि दुसरा चरण पहिल्या चरणाहून किञ्चित् निराळ्या रीतीने म्हटला जातो. भूपाळी, लावणी या चाली आहेत, या भिन्न भिन्न जाती नव्हत . * घनश्याम सुन्दरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही होनाजी बाळाची सुप्रसिद्ध भूपाळी लावणीसारखी म्हणतां ये औील, तर झुलटपक्षीं प्रभाकराची 'कधि ग भेटशिल अता जिवाचे जिवलग मैतरणी' ही लावणी थेट भूपाळीसारखी म्हणतां ये औील. आंतील विपयाला अनुकूल अशी चाल पद्याला लाविल्याने पद्राच्या सरसतेंत भर पडते. वैचित्र्याच्या रसपरिपोषक सूक्ष्म छटा या श्रुतिसिद्ध कवीच्या रचनेत जशा येऊ शकतात तशा त्या धेोपटमार्ग कवीच्या रचनेत येअं शकत नाहीत. ८ काव्यपठन आणि गायन छन्दाला चाल लागत असली तरी छन्द वा काव्य म्हणजे सङ्गीत नव्हे छन्द म्हणजे लयबद्ध अक्षररचना होय. ही अक्षरशः पहातां अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक, पञ्चमात्रक आणि चतुर्मात्रक अशा आवर्तनाची असते. परन्तु गायकी तालांची सङ्ख्या पाचच आहे असें नाही. अक्षरशः पहातां भिन्न तालांत बसणारें पद्य गवऔी मात्रा जुळवून घेथून निराळ्याच तालांत १ पहिल्या व तिस-या चरणांचा न्यास बहुतेक वृत्तांत ऋषभ स्वरावर होतो तर दुस-या व चौथ्या चरणांचा न्यास षड्जावर होतो. झुदाहरणार्थ, अिन्द्रवज्रा म्हणतांना पहिल्या चरणांत सा सा रे ग म प म ग रे सा रे असा स्वरक्रम असतो तर दुस-या चरणांत ग ग रे सा नि नि रे ग रे सा सा असा स्वरकम होती पण छन्दोदृष्टया दोन्ही चरण अभिन्नच असतात. झुलटपक्षीं स्वागता आणि रथोद्धता ही वृत्तें भिन्न भिन्न आहेत तथापि त्यांचे स्वरलेखन अॅकच आहे. प्रो. ग. ह. रानडे यांचा लेख पहा.(भारतीय सङ्गीत ३/२)
पान:छन्दोरचना.djvu/३६
Appearance