पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:४१, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

 नियतकालिक मेजवान्या हा एक चिनी लोकांच्या करमणुकीचा विशेष प्रकार आहे. चीनमध्ये आठवड्यांतून एक दिवस विश्रांति घेण्याची पद्धत नाहीं. * वर्षातून सणाचे ह्मणून कांही दिवस ठरलेले आहेत. त्या दिवशीं बरेच व्यापारी व मजूर विश्रांति घेतात; परंतु सर्वच घेतात असें नाहीं. 'नवीन वर्ष सुरू होण्याचे वेळीं मात्र अगोदर १० दिवस व मागाहून २० दिवस सर्वांनीं विश्रांति घेतलीच पाहिजे, असा नियम आहे. ह्या कालांत सर्व सरकारी कचेऱ्या बंद असतात व त्या वेळीं अधिका-यांनी कांहीं काम करूं नये ह्मणून त्यांच्या अधिकाराचे शिक्के त्यांच्या स्त्रियांच्या स्वाधीन करण्याची 'चाल पडलेली आहे. व्यापारी लोकांनीं आपले सर्व हिशेब सुटी सुरू होण्या- पूर्वी संपविले पाहिजेत, असा शिरस्ता आहे.त्यापूर्वी कांहीं दिवस प्राणी- मात्रांनां मिठाई अर्पण करण्याची चाल आहे. हेतु हा कीं,त्यायोगें पुढील वर्ष चांगलें जावें. ह्या मोठ्या सुटीत जिकडे तिकडे आनंदीआनंद होऊन दारूकाम सोडण्यांत येते. मित्र, आप्त, अधिकारी, राजा व प्रजा हीं एक- मेकांस बक्षिसे देतात, मेजवान्या करितात व नाच तमाशे, नाटकें, गाणी इत्यादि प्रकारांनी आपली करमणुक करितात. ह्या दिवसांत मलिन वस्त्र कोणाच्याही अंगावर नसतें. भिकान्यांना सुद्धां नवीं वस्त्रे मिळतात. या वेळचे श्रीमंत व सरदार लोकांचे पोषाख अत्यंत प्रेक्षणीय असतात. सर्व लोक एकमेकांस नमस्कार करून लक्ष्मीवंत होण्याचा आशिर्वाद देतात. चिनी नवें वर्ष ऊर्फ पाडवा ता० २) जानेवारीपासून २० फेब्रुवारीच्या दरम्यान केव्हां तरी येतो. आणि त्या वेळीं चीन देशांत जो कोणी परका मनुष्य जाईल त्यास जिकडे तिकडे उत्सव व आनंदी-आनंद दिसून येईल. पिंवळ्या, निळ्या, जांभळ्या व लाल रेशमी रंगांच्या झग्यांनी विभूषित झालेले श्रीमान् व सरदार लोक, राजघराण्यांतील पुरुष, व शुभ्र रेशमी कपडे घातलेले सामान्य लोक हे रस्त्यामध्ये एकमेकांस प्रेमाने भेटून परस्परांस कल्याणप्रदे आशिर्वाद देत असलेले पाहून कोणाचे हृदय उचंबळून येणार नाहीं ? कांहीं वर्षांपूर्वी सीमोल्लंघनाचे वेळीं महाराष्ट्रांत हा प्रेक्षणीय व आनंदाश्रु उत्पन्न

 * अलीकडे युरोपियन व्यापा-यांच्या सहवासानें कित्येक चिनी व्यापारी रविवारीं विश्रांति घेऊं लागले आहेत. पण अद्याप तसा प्रघात देशांत सर्वत्र पडलेला नाहीं.