पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक ४ था .

३९

१५:३६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:३६, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

उभे करावे लागतात. बंगाल्यांतील प्रख्यात कवि रवींद्रनाथ टागोर यांचे मतें खरें कौशल्य वरील पद्धतींतच आहे. त्यांनां पाश्चात्य राष्ट्रांतील सीनसिनरीची ( देखाव्यांची ) पद्धत पसंत नाहीं. अर्थात्, त्यांच्यासारख्यांच्या दृष्टीनें चिनी नट व चिनी रंगभूमि ह्रीं अधिक श्रेष्ठ ठरणार हे उघड आहे. अशाच प्रकारची पद्धत इंग्लंडमध्ये इलिझाबेथ राणीच्या वेळी होती व आमच्याकडेही कांहीं दिवसांपूर्वी किर्लोस्कर व शाहुनगरवासी मंडळींच्या नाटकांत होती. ह्या दोन्ही मंडळीतील नट आपापल्या कामांत पुष्कळ कुशल असल्याकारणानें देखाव्यांच्या अभावामुळे नाटकप्रयोगास कधींही कमीपणा येत नसे, हें इकडील पुष्कळ नाट्यकलालोलुप मंडळीस ठाऊक असेलच. हीच स्थिति .सध्यां चीनमध्यें आहे. चिनी रंगभूमीचे कांही ठळक दोष असे आहेत:--- ( १ ) तेथें पडदे नसतात. ( २ ) पडदे, खुर्च्या, टेबलें, चहाचे पेले वगैरे सामान प्रेक्षकांदेखत व खेळ चालू असतां वेळोवेळी - जरूर पडेल तेव्हां - एका नोकराकडून रंगभूमीवर आणतात. ( ३ ) एखादा नट मृताच्या वेषांत जरी असला तरी आपले काम आटोपतांच स्वतः उठून निघून जातो. ( ४ ) प्रत्येक अंकानंतर विश्रांति घेण्यांत येत नाहीं, त्यामुळे खेळ लांबलचक बाहून कंटाळा येतो; वगैरे.

 लहान मुलें व गरीब लोक यांच्या करमणुकीकरितां लळितवजा खेळ व देखावे चीनमध्ये नेहमीं - बहुधा प्रत्येक शहरांत होत असतात. अशा प्रकारचें खेळ ख्रिस्तोशकापूर्वी सुमारे ७०० वर्षांपासून तेथे चालू आहेत. प्रांतिक लष्करी अगर अन्य थोर पुरुषांचीं चरित्र व धार्मिक समजुती हाँ ह्या खेळांचे विषय असतात. इकडील गारुडी, डोंबारी यांच्या खेळासारखे खेळही तिकडे पुष्कळ प्रकारचे आहेत व ते नित्य चालू असतात. ह्यांशिवाय सार्वजनिक ठिकाणी गोष्टी सांगून लोकांची करमणुक करण्याचा प्रकारही तिकडे विशेष प्रचारांत आहे. ह्या गोष्टी नैतिक असून शौर्य, धैर्य व साहसादि गुणांनीं भरलेल्या असतात.

 भूतचेष्टा, चेटक्या व त्यांच्या लीला या गोष्टींचीही तेथे रेलचेल आहे. भूतांसंबंधी हजारों गोष्टी प्रचलित असून त्या एक करमणुकीचे साधन बनल्या आहेत.